File Photo : Crime
हिंगोली : औंढा तालुक्यातील वगरवाडी गावात प्रेमप्रकरणातून एका तरूणीची हत्या केल्याची माहिती उघडकीस आली. रिलेशनशिपमध्ये झालेल्या वादातून प्रियकराने तरूणीची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह जंगलात फेकला. हत्या केल्यानंतर तरूणीची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचण निर्माण होत होती. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत.
हेदेखील वाचा : रक्तरंजित थरार! आधी पत्नी आणि निष्पाप मुलाची हत्या, नंतर आई-वडिलांवर हल्ला मग आत्महत्येचा प्रयत्न
प्रेम प्रकरणात कोण कधी टोकाचे पाऊल उचलेल सांगता येत नाही. अशीच एक विचित्र घटना हिंगोलीमध्ये घडली. या प्रकरणानंतर, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तरूणीच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वगरवाडी शिवारात 29 वर्षीय तरूणीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकल्याची माहिती आहे. तरूणीची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली आणि गुन्ह्याची नोंद केली.
दरम्यान, तरूणीची हत्या केल्याने तिची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचण येत होती. मात्र, पाच दिवसांनंतर मृत तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मृत तरूणी नगर जिल्ह्यातील जामखेडमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृत तरूणीचे नाव अलका बाजीराव बेंद्रे असून, या तरूणीची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती पोलीस तपासातून निष्पन्न झाले.
रिलेशनशिपमध्ये असताना सातत्याने वाद
आरोपी श्रीकांत सुरेश पिनलवार आणि तरूणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपमध्ये सतत वाद होत असल्याने आरोपीने छत्रपती संभाजीनगर येथील लाडगावमधील भाड्याच्या रूमध्ये तरूणीचा गळा आवळून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जंगलामध्ये टाकला. नंतर आरोपी आदिलाबादला गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेत आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
गुजरातमध्ये दोघांची हत्या
गुजरातमधील सुरत शहरात रागाच्या भरात एका व्यक्तीने पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर त्याने वृद्ध आई-वडिलांवरही चाकूने हल्ला करुन नंतर गळा कापून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आत्महत्येच्या प्रयत्नात तो अयशस्वी प्रयत्न केला.
हेदेखील वाचा : Parbhani Crime : परभणीत धक्कादायक प्रकार; वंशाच्या दिव्यासाठी पत्नीला जिवंत जाळले, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू