आई-वडिलांवर हल्ला मग आत्महत्येचा प्रयत्न (फोटो सौजन्य-X)
Surat Crime News Marathi: गुजरातमधील सुरत शहरात रागाच्या भरात एका व्यक्तीने पत्नी आणि 4 वर्षाच्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर त्याने वृद्ध आई-वडिलांवरही चाकूने हल्ला करुन नंतर गळा कापून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र या आत्महत्येच्याल प्रयत्नात तो अयशस्वी प्रयत्न केला
34 वर्षीय स्मित जिवानी असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी व मुलाचा भोसकून खून केला आणि आई-वडिलांवर हल्ला करून जखमी केले. पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) विपुल पटेल यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार स्मित जिवानी नावाचा माणूस आपल्या मामाच्या कुटुंबाने आपल्या कुटुंबाशी संबंध तोडल्यामुळे नाराज होता. तसेट आरोपी स्मित जिवानी यांनी शुक्रवारी सकाळी सुरत शहरातील सरथाना भागात त्यांच्या घरी पत्नी हिरल (३०), मुलगा चाहत (४), आई विलासबेन आणि वडील लाभूभाई यांच्यावर चाकूने हल्ला केला. कुटुंबीयांवर चाकूने वार केल्यानंतर जिवानीनेही गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला.
कौटुंबिक वादातून सुखी घरात कलह सरठाणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला. कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती, परंतु कौटुंबिक वादामुळे घरात कलह होता. त्यामुळे ही दुःखद घटना घडली. हे कुटुंब मूळचे सावरकुंडला, अमरेली येथील आहे.
रक्ताच्या थारोळ्यात आई घराबाहेर पडली याबाबत सोसायटीतील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घर क्रमांक 804 मध्ये राहणाऱ्या स्मित जवानी याने पत्नी हिरलबेन आणि मुलगा चाहत यांचा गळा चिरून खून केला होता. यानंतर त्याने वडील लाभूभाई आणि आई विलासबेन यांच्यावर हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात आई घरातून बाहेर आली आणि तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावले. काही वेळातच वडीलही रक्तबंबाळ अवस्थेत घराबाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसले.
या हल्ल्यात आरोपीची पत्नी हिरल आणि मुलगा चाहत यांचा मृत्यू झाला, तर जिवानी आणि त्याचे आई-वडील जखमी झाले. या तिघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले की, तपासादरम्यान जिवानी हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे त्याच्या मृत मामाच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी व त्याच्या कुटुंबीयांशी संबंध तोडून त्यांना त्यांच्या घरी येण्यास मनाई केल्याचे समोर आले आहे.
पोलीस उपअधीक्षक विपुल पटेल पुढे म्हणाले की, या रक्तरंजित घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी कसून तपास करण्यात येत आहे. पोलिसांचे पथक या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहे. सध्या. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.