बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक
नागपूर : प्रतापनगरातील श्री गणेशा अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या ‘एक्झेल युनिसेक्स सलून’मध्ये स्पा आणि मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकत देहव्यापाराचा भांडाफोड केला. सलूनवर छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली, तर दोन आरोपींना अटक करण्यात आली.
भरत प्यारेलाल कश्यप (वय 35, रा. व्यंकटेशनगर, खामला) आणि संजय उमाजी आष्टीकर (रा. तकिया, धंतोली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघेही सलूनच्या आड पीडित तरुणींना पैशांचे आमिष दाखवत त्यांना ग्राहक आणि व्यवसायासाठी जागा पुरवायचे. गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक मंगळवारी संध्याकाळी प्रतापनगर हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान खबऱ्यांकडून ‘एक्झेल युनिसेक्स सलून’मध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, दोन तरुणी ग्राहकांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या.
आरोपी भरत कश्यप आणि संजय आष्टीकर हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहव्यवसाय चालवत होते. आरोपी पीडित तरुणींना पैशांचे आमिष दाखवत देहव्यवसायाच्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांना ग्राहक आणि व्यवसायासाठी जागा पुरवायचे, अशी माहिती समोर आली आहे.
दोन मोबाईल फोनसह रोकडही जप्त
पोलिसांनी या कारवाईत 2 मोबाईल फोन, 19600 रुपये रोख आणि इतर साहित्य असा एकूण 75630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना प्रतापनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कल्याणमध्येही पोलिसांची कारवाई
मुंबईच्या कल्याण परिसरातील गुन्हे वाढताना दिसत आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण स्टेशन परिसरात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या तिघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोन महिला असून, एक पुरुष आहे. अटक आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.