Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: लग्नासाठी दबाव आणि बदनामीची भीती; नांदेडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

नांदेडमध्ये 16 वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तरुणासह पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 26, 2026 | 08:35 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फोटो व्हायरल करण्याची धमकी व लग्नासाठी दबाव असल्याचा आरोप.
  • बदनामीच्या भीतीपोटी 23 फेब्रुवारी रोजी मुलीने गळफास घेतला.
  • भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.
नांदेड: नांदेड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. एका तरुणांनी तिच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. जर तिने लग्न केले नाही तर मोबाईलमधील जोडीने काढलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने तिला दिली. याच कारणामुळे तिने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणारी मुलगी केवळ १६ वर्षांची असून ती दहावीत शिक्षण घेत होती. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?

किनवट तालुक्यातील अंधबोरी येथील दोन बहिणी शिक्षणासाठी नांदेड शहरातील पंढरपूर नगर येथे भाड्याने राहत होत्या. मृतक अल्पवयीन मुलगी ही दहावीत शिक्षण घेत होती. किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील दीपक सोळंके सोबत ओळख झाली. तेव्हा दोघांनी मोबाईलमध्ये एकत्र फोटो काढले होते. ते दोघे फोन वर बोलत होते. मात्र काही करणास्तव पीडित मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यानंतर दीपक हा लग्नास आणि बोलण्यास भाग लावत असे, आणि जर होकार नाही दिला तर एकत्र असलेली फोटो व्हायरल करतो अशी धमकी तो देत होता. दरम्यान,आरोपी दिपकचा चुलत भाऊ पवन साळुंके हा देखील मृत मुलीच्या बहिणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. असा आरोप मृतक मुलीच्या वडिलांनी तक्रारीत केले आहे.

Chandrapur: चंद्रपूरमध्ये 13 महिन्यांत 82 मृत्यू; महामार्ग की ‘मृत्यूचा सापळा’?

आपली बदनामी होणार या भीतीने अल्पवयीन मुलीने २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास खोलीतील स्लॅबच्या हुकास ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मृतक मुलीच्या घरमालकाने तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी दीपक विष्णू सोळंखे, पवन शंकर साळुंके, करण शंकर साळुंके, विष्णू उत्तम साळुंके, शंकर उत्तम साळुंके या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

नांदेड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाची खंजीराने वार करून हत्या करण्यात आली आहे. कमलप्रीत सिंग खालसा असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो केवळ १६ वर्षांचा होता. ही घटना गोवर्धन घाट पुलाजवळ घडली. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Uttarpradesh Crime: पुन्हा निळा ड्रम प्रकरण! थरारक वेबसिरीज बघितली अन् जन्मदात्याची केली हत्या, 21 वर्षीय मुलाला अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नांदेड शहरातील पंढरपूर नगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: आत्महत्येमागील कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी व लग्नासाठी दबाव हे कारण असल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तरुणासह पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Nanded crime pressure for marriage and fear of defamation a class 10th student in nanded took an extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय…! प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या, अखेर भयानक मर्डर मिस्ट्रीचा ‘असा’ झाला उलगडा
1

मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय…! प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या, अखेर भयानक मर्डर मिस्ट्रीचा ‘असा’ झाला उलगडा

Mira Bhayandar News: ‘तू मला ओळखत नाहीस… कुर्ल्यात चौकशी कर’; पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण
2

Mira Bhayandar News: ‘तू मला ओळखत नाहीस… कुर्ल्यात चौकशी कर’; पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण

Mumbai News: ‘एका महिन्यात 50% परतावा’… या एका आमिषाने गमावले तब्बल 1 कोटी रुपये!
3

Mumbai News: ‘एका महिन्यात 50% परतावा’… या एका आमिषाने गमावले तब्बल 1 कोटी रुपये!

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजला विरोध केला… संतप्त जावयाने कुऱ्हाडीने सासूवर सपासप केला वार
4

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजला विरोध केला… संतप्त जावयाने कुऱ्हाडीने सासूवर सपासप केला वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.