नंदुरबारमध्ये भाविकांवर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू १० जण गंभीर जखमी
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात अष्टंबा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणारा पिकअप ट्रक चांदशैली घाटात उलटला. एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते खोल दरीत कोसळल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, या दुर्दैवी अपघातात सहा यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला तर १० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी जखमींना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. या घटनेने ग्रामीण भागात हादरून गेले आहे.
Chhagan Bhujbal News: जातगणनेची मागणी ओबीसी समाजाच्या न्यायासाठी; छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व यात्रेकरू अष्टंबा यात्रा पूर्ण करून त्यांच्या गावी परतत होते. या प्रदेशात ही यात्रा एक धार्मिक कार्यक्रम मानली जाते आणि दरवर्षी हजारो लोक यात सहभागी होतात. घाट परिसरातील एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे पिकअप उलटली, अशी माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की आत असलेले अनेक लोक चिरडले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर आरडाओरडा आणि एकच गोंधळ उडाला. अनेक भाविक वाहनाखाली अडकले होते आणि स्थानिक रहिवाश्यांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले. तोपर्यंत पोलिस पथक आणि स्थनिका ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले होते. जखमांना ताबडतोब तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. गंभीर जखमी भाविकांना चांगल्या उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
पुणे-बंगळूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; कोंडी सोडवण्यासाठी खुद्द पोलिस उपअधीक्षक उतरले रस्त्यावर
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली. घाटातील एका वळणावर वाहन वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले असावे आणि हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे. मृतांची ओळख पटवली जात आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.