मध्य रेल्वेवरील कर्जत दिशेला असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात येणारा रस्ता खराब झाला होता. उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील डिकसळ येथे मोठ्या प्रमाणात वसाहती वाढत असून लोकलने प्रवास करण्यासाठी असलेला रस्ता डिकसळ येथून भिवपुरी स्थानकात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दैनंदिन अवस्था झाली होती. या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना किशोर गायकवाड यांच्या पाठपुराव्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून डिकसळ गावापासून ते भिवपुरी रोड स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असल्यामुळे येथील प्रवासी आणि स्थानिक रिक्षा चालक यांच्याकडून या रस्त्याच्या कामाची सतत मागणी होत होती.या रस्त्याचे काम व्हावे याकरता कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांना भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना चे अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.
भिवपुरी रोड स्टेशनकडे जाणाऱ्या डिकसळ गावातून भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेला रस्ता खड्ड्यात हरवला होता. आमदार महेंद्र थोरवे यांनी रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली. रस्त्याच्या कामांसाठी प्रवासी संघटनेचा पाठपुरावा सुरू होता. या रस्त्याचे काम सुरू झाले असून भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी कामाच्या ठिकाणी उभे राहून काम करून घेत आहेत.कामाचा शुभारंभ झाला त्यावेळी अध्यक्ष किशोर गायकवाड, सदस्य रवींद्र राऊत, जय विजय पाटील,महेश कडव,राजेश विरले,नाना म्हसे आदी सदस्य उपस्थित होते.






