Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik: मध्यरात्री आलिशान गाड्यांतून आले अन् स्मशानभूमीत केली अघोरी विधी; अर्धनग्न मांत्रिक, अंडी, लिंबू,आणि…

नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील जुन्या अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अर्धनग्न मांत्रिकासह काही जणांनी तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप असून हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. घटनेनंतर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची मागणी होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2026 | 12:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सटाण्यातील जुन्या अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा केल्याचा आरोप.
  • अर्धनग्न मांत्रिकासह संशयितांचा वावर आणि विधी CCTV कॅमेऱ्यात कैद.
  • अंडी, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर यांसारखे साहित्य घटनास्थळी आढळले; कारवाईची मागणी.
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाण्यामध्ये स्मशानभूमीत अघोरी पुजा करण्याचा प्रकार समोर आला आहे. अंडी, लिंबू, कपूर अश्या नारळ तसेच इतर तांत्रिक साहित्य सापडून आले. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

काय नेमकं प्रकरण?

महाराष्ट्र हा पुरोगामी समजला जातो. राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा आहे. मात्र तरीही अंधश्रद्धा कमी होण्याचं नाव घेत नाही. आता नाशिक जिल्ह्यातील सटाण्यामध्ये स्मशानभूमीत अघोरी पुजा करण्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही संशयित व्यक्ती आलिशान वाहनांमधून जुन्या अमरधाम परिसरात दाखल झाले होते. त्यामुळे सुरूवातीला त्यांच्यावर कोणाचा संशय आला नाही. त्यांच्या सोबत भगवे वस्त्र धारण केलेला अर्धनग्न मांत्रिकही असल्याचे सांगितले जात आहे.

Gadchiroli Crime: Instagramवर जुळलं समलैंगिक प्रेम, लग्नाला नकार मिळताच मित्राचा गळा चिरून खून

या व्यक्तींने स्मशानभूमीतील चितास्थळाजवळ जाऊन अघोरी पूजा सुरू केली. या पूजेसाठी अंडी, लिंबू, उडीद, कवड्या, फुले, कापूर, नारळ तसेच इतर तांत्रिक साहित्याचा वापर करण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले. पूजा संपल्यानंतर हे साहित्य तेथेच टाकून देण्यात आले. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू सोबत नेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घ्यावा, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिच्यासाठी घर सोडलं, तिनेच प्रियकराला संपवलं; लिव्ह-इन रिलेशनशिपचा थरारक अंत! नाशिक येथील घटना

नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय प्रेयसीने आपल्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराची हत्या केल्याची समोर आली आहे. या घटनेने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना ही नाशिकच्या पेट्रोल परिसरात घडली.

या प्रकरणातील आरोपीचे नाव सोनाली राजेंद्र गायकवाड (32 वर्ष) असे आहे. तर हत्या झालेल्या तरुणाचे नाव पंढरीनाथ दांडगे (26 वर्ष) असे आहे. सोनाली ही विवाहित होती. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सोनाली सोबतचे संबंध अमोलच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. याला त्याच्या घरच्यांचा कडाडून विरोध होता. त्यामुळे अमोल ने आपले घर सोडले. तो सोनाली सोबत साळवे चाळ नवनाथ नगर इथे लिव्ह इन मध्ये राहत होता. त्याचवेळी सोनाली हिला अमोल शेठ दुसऱ्या एका बाईसोबत संबंध असल्याचे समजले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तिने अमोलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

Jalna Accident: झाडावर आदळली कार, क्षणात पेटली आग; चालकाला बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील जुन्या अमरधाम स्मशानभूमीत ही घटना घडली.

  • Que: अघोरी पूजेबाबत कोणते पुरावे समोर आले आहेत?

    Ans: संपूर्ण प्रकार स्मशानभूमीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनास्थळी पूजेसाठी वापरलेले साहित्यही आढळले.

  • Que: या प्रकरणात काय मागणी करण्यात येत आहे?

    Ans: संशयितांचा शोध घेऊन जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Nashik aghori vidhi in the middle of the night in a luxurious car and in the graveyard half naked mantrika undi limbu and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
1

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा
2

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
3

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
4

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.