Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय

नाशिकच्या इंदिरानगर परिसरात PGमध्ये राहणाऱ्या वैष्णवी अनिल आवारे (मूळ रा. अमळनेर, जळगाव) या तरुणीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री 10.30 वाजता घडलेल्या या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 18, 2026 | 10:10 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नाशिकच्या इंदिरानगरमध्ये PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची चाकूने वार करून हत्या.
  • मृत तरुणीची ओळख वैष्णवी अनिल आवारे (रा. अमळनेर, जळगाव) अशी झाली.
  • प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय; आरोपीचा शोध सुरू.
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुण मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. घडलेली घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

काय घडलं नेमकं?

वैष्णवी अनिल आवारे असे मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवी ही मूळची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असून ती नाशिकमध्ये वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. रात्रीच्या वेळी सोसायटीजवळून जात असतांना एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर अचानक हल्ला केला. त्याने धारदार चाकूने वैष्णवीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, वैष्णवी थेट रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. त्यांनतर तिथून हल्लेखोर फरार झाला.

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. हा संपूर्ण प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

आम्हाला मारून टाकणार होते…; गाडी अडवून काचा फोडल्या, टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून पर्यटक कुटुंबाने वाचवला जीव

नाशिकमधील प्रसिद्ध भावली धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटक कुटुंबासाठी सहलीचे रूपांतर थरारक अनुभवात झाले. महिलेला छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या काही तरुणांनी कुटुंबाचा तब्बल चार ठिकाणी पाठलाग करत गाडीची तोडफोड केली, दगड-रॉडने जीवघेणा हल्ला केला आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केला आहे. जीव वाचवण्यासाठी या कुटुंबाला टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून पळ काढावा लागल्याचा धक्कादायक खुलासा कुटुंबांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून एक मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

Crime: अमरावतीत ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळलं; पैशाच्या वादातून हत्या, पंजाबचा आरोपी जळगावातून अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीचे नाव काय होते?

    Ans: वैष्णवी अनिल आवारे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: इंदिरानगर, नाशिक.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक संशय कशावर आहे?

    Ans: प्रेमप्रकरणातून हत्या.

Web Title: Nashik crime young woman living in a pg accommodation brutally murdered in broad daylight love affair suspected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
2

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर
3

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
4

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.