Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: FDAचा मोठा दणका! नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश

नाशिकमध्ये 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेंतर्गत एफडीएने 20 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले, तर परवाना नसलेल्या 4 हॉटेल्सना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 04, 2026 | 12:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • एफडीएने नाशिकमधील 20 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली.
  • नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, तर 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
  • स्वयंपाकघरातील अस्वच्छता, उघड्यावर ठेवलेले अन्न आणि नियमभंगामुळे ही कारवाई करण्यात आली.
नाशिक: राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमध्ये मोठी धडक कारवाई केली आहे. अवघ्या दोन दिवसांत 20 नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने 7 हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले, तर आवश्यक परवाना नसलेल्या 4 हॉटेल्सना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हॉटेलच्या स्वयंपाकघरात मोठी अस्वच्छता

एफडीएच्या तपासणीत अनेक हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळली. ग्राहकांना दिले जाणारे अन्न उघड्यावर ठेवले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे अन्न खराब होण्याची आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनीही स्वच्छतेचे नियम पाळले नसल्याचे आढळले. कोल्ड स्टोरेज आणि अन्न योग्य तापमानात ठेवण्याच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले होते. त्यामुळे एफडीएने संबंधित हॉटेल्सवर कारवाई केली.

Ketan Agrawal Murder Case: ‘जे लग्न होणार नाही…’; सियाच्या कथित चॅटमधून धक्कादायक प्लॅनिंगचा खुलासा!

4 हॉटेल्स थेट बंद

या धडक कारवाईत 4 हॉटेल चालकांकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक असणारा परवानाच उपलब्ध नसल्याचे समोर आले. एफडीए प्रशासनाने याची गंभीर दखल घेत, जोपर्यंत कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत या चारही हॉटेल्सचा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश दिले आहेत.

पुढेही कारवाई सुरू राहणार

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल्सवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुकाराम मुंढेंच्या ‘मोक्का’ आदेशाला हायकोर्टात आव्हान

अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यानुसार प्रतिबंधित खाद्यपदार्थांचे उत्पादन, वाहतूक, साठवण आणि विक्री करणाऱ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 12 जून 2026 रोजी जारी केलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले. यालाच बुलढाणा येथील मोहम्मद इक्बाल मोहम्मद शफी यांनी आवाहन दिले आहेत. मोहम्मद इक्बाल मोहम्मद शफी यांनी दाखल केलेल्या याचिकेत हा आदेश मनमानी, एकतर्फी आणि नागरिकांच्या अधिकारांचा दुरुपयोग करणारा असल्याचा दावा करत तो रद्द करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणाची दखल घेत नागपूर खंडपीठाने अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावत तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Mumbai Hit and Run: भरधाव टँकरची डिलिव्हरी बॉयला धडक; जागीच मृत्यू, चालकाला नागरिकांनी पकडलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: एफडीएने नाशिकमध्ये किती हॉटेल्सची तपासणी केली?

    Ans: 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेंतर्गत 20 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली.

  • Que: किती हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली?

    Ans: अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले, तर परवाना नसलेल्या 4 हॉटेल्सना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

  • Que: एफडीएने कारवाई का केली?

    Ans: हॉटेल्समध्ये अस्वच्छ स्वयंपाकघर, उघड्यावर ठेवलेले अन्न, कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Nashik news major crackdown by the fda licenses of 7 hotels in nashik suspended orders issued to shut down 4 hotels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • crime
  • FDA
  • Nashik
  • Nashik Crime
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
1

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
2

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Nashik Earthquake: नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
3

Nashik Earthquake: नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात
4

MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.