crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबई : मुंबई शहर दोन घटनांनी हादरली आहे. नालासोपारा येथे एका नायजेरियन युवकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर मीरा भाईंदर येथे एका डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनेने मुंबई हादरली आहे. या दोन्ही घटनेचा संबंधित पोलिसांकडून तपास सुरु आहे.
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी ‘या’ भागात सापळा रचून पकडले
कसा झाला डिलिव्हरी बॉयचा मृत्यू?
मीरा भाईंदर पश्चिमेला डंपरखाली येऊन झेपटो डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात भाईंदर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर हा अपघात घडला. मृतक हा झेपटो या ऑनलाईन डिलिव्हरी सेवेसाठी काम करत होता. प्रत्यक्षदर्शींच्या मते, डिलिव्हरी बॉय उड्डाणपुलावरून जात असताना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याचा दुचाकीवरील तोल सुटला आणि तो थेट समोरून येणाऱ्या डंपरच्या मागच्या चाकाखाली गेला. या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेनंतर डंपर चालक घटनास्थळावरच थांबला असून, पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
नायजेरियन तरुणाची हत्या
नालासोपाऱ्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे.नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक राहत आहेत. नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथे त्यांची सर्वाधिक संख्या आहे. क्षुल्लक वादातून एका नायजेरियन नागरिकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नालासोपारा पूर्वेचा प्रगतीनगरमध्ये ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव लकी इकेचकव उईजे (32)असे आहे. शनिवारी मध्यरात्री प्रगतीनगरच्या रोशन अपार्टमेंट येथील मोनू किराणा दुकाना जवळ तीन नायजेरियन बातचीत करत उभे होते. त्यावेळी त्यांच्या परिचयाचा लकी इकेचकव उईजे (32) हा तिथे आला. काही वेळात त्यांच्यात क्षुल्लक बाबीवरून मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी दोघांनी लकी याच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी तुळींज पोलिसांनी तीन नायजेरियन नागरिकांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (2), 3 (5) प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी २ आरोपी नायजेरियन नागरिकांना अटक केली असून तर एक आरोपी फरार झाला आहे.पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अयूला बाबाजिदे बार्थलोम (50), ओघेने इगेरे (47) यांना अटक करण्यात आली असून ओडिया इझू पेक्यूलिअर (50) हा फरार आहे.
मोठी बातमी ! जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक; गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न