वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमरावती : सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या एका कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झाल्याची घटना रविवारी (दि.23) घडली. ही धक्कादायक घटना नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः सुद्धा आत्महत्या करून जीवन संपवले.
हेदेखील वाचा : Cyber Crime: “माझ्या लग्नाला या”, निमंत्रण पत्रिका उघडताच बँक खाते रिकामे झाले, काही क्षणातच ७५ हजार रुपये गायब
अमोल सुरेश गायकवाड (वय 35), शिल्पा अमोल गायकवाड (वय 32, दोन्ही रा. रहाटगाव) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतील मूळ कारण अद्याप पुढे आले नाही. त्यामुळे नांदगाव पेठ पोलिस सर्वच बाजूने तपास करत आहे. मूळचे धामणगाव तालुक्यातील वाठोडा व सध्याचे रहाटगाव येथील रहिवासी अमोल गायकवाड आणि रामगाव येथील शिल्पा गायकवाडचा सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता.
प्रज्वल पाथरे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते. त्याठिकाणी असलेल्या दुमजली फार्म हाऊसमध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते.
पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. महिलेच्या डोक्याला अंतर्गत दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या घटनेच्या अनुषंगाने सद्यास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
श्वान पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महेंद्र अंभोरे यांनी तत्काळ पोलिसांचा ताफा घेऊन घटनास्थळ गाठले. त्यानंतर श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला सुद्धा यावेळी पाचारण करण्यात आले. पोलिस उपायुक्त सागर पाटील, फ्रेजरपुरा विभागाचे एसीपी कैलास पुंडकर हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून शिल्पा व अमोल यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले.
सुसाईड नोट मिळाली
अमोलने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये आई-वडिलांना सांगितले की, ‘मीच जबाबदारी आहे, मीच गुन्हेगार आहे, मला माफ करा’, असे लिहून ठेवले आहे. त्यामुळे कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : Dhule News: प्रेम प्रकरणातून तरुणाची बेदम मारहाण, मग निर्घृण हत्या; फेकून दिले नाल्यात, शिरपूर तालुका हादरला