Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाची फसवणूक; तब्बल 25 हजारांना घातला गंडा

मदतीचा बहाणा करून एका अनोळखी व्यक्तीने एटीएममध्ये वृद्धाची फसवणूक करत त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांच्या खात्यातून २५ हजार ५५० रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2025 | 12:30 AM
एटीएममध्ये पुरेशी रक्कम उपलब्ध

एटीएममध्ये पुरेशी रक्कम उपलब्ध

Follow Us
Follow Us:

पुणे : मदतीचा बहाणा करून एका अनोळखी व्यक्तीने एटीएममध्ये वृद्धाची फसवणूक करत त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांच्या खात्यातून २५ हजार ५५० रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ७८ वर्षीय ज्येष्ठाने कोंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ एप्रिलला कोंढवा खुर्द येथील कोणार्क पुरम सोसायटीजवळील बँक ऑफ बडोदा एटीएम सेंटरमध्ये घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्यांच्या पत्नीसह एटीएममध्ये पैसे काढण्यास गेले होते. तेव्हा एटीएम मशीनमध्ये त्यांचे कार्ड अडकले. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या अनोळखी व्यक्तीने पुढे येत “मदत करतो” असे सांगून तक्रारदाराची दिशाभूल केली. कार्ड मशीनमधून काढून ते स्वतःजवळ ठेवले आणि त्याच्या जवळ असलेले अन्य एक कार्ड तक्रारदाराला दिले. त्यावेळी गोंधळात वृद्ध दाम्पत्याला ही अदलाबदल लक्षात आली नाही. नंतर त्या अज्ञाताने त्यांच्या एटीएमचा वापर करून ५ हजार रुपये काढले. त्यानंतर केदारी पेट्रोल पंपावर कार्ड स्वाईप करून १० हजार ३०० रुपये आणि १० हजार २५० रुपये अशा दोन व्यवहारांद्वारे एकूण २५ हजार ५५० रुपये त्यांच्या खात्यातून काढले. तक्रारदाराला काही दिवसांनी बँकेकडून व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर फसवणुकीचा उलगडा झाला. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, एटीएम लॉग्ज, तसेच पेट्रोल पंपावरील व्यवहारांचा तपशील तपासला जात आहे.

फलटणमध्येही फसवणूक

गेल्या काही दिवसाखाली ‘काका तुमच्या एटीएमवरून पैसे निघत नाहीत, हे धरा तुमचे कार्ड’, असे म्हणून एटीएम कार्डची अदलाबदल करून अज्ञाताने सुमारे पावणेदोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फलटण येथे ही घटना घडली आहे. याबाबत पोपट दत्तोबा साळुंखे (रा. राजुरी, ता. फलटण) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: One person was cheated in pune by changing atm card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • cmomaharashtra
  • Crime in Pune
  • Pune Froud News

संबंधित बातम्या

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार
1

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार

संभाजीनगर हादरलं! तरुणीचे अपहरण करून अत्याचार; अ‍ॅम्ब्युलन्समधून नेले अन्…
2

संभाजीनगर हादरलं! तरुणीचे अपहरण करून अत्याचार; अ‍ॅम्ब्युलन्समधून नेले अन्…

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ
3

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल
4

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.