Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…

नऊ महिन्यांची गर्भवती... पोटातील बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळलेली आणि पोटातील पाण्याचे प्रमाणही कमी झालेले. डॉक्टरांनी तातडीने सिझेरियनचा सल्ला दिला; मात्र उपचाराच्या खर्चावरून रुग्णालयात दाखल करण्यात विलंब झाला अन् अखेर आईसह पोटातील बाळाचाही दुर्दैवी अंत झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 02, 2026 | 03:13 PM
Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’... उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही...

Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’... उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही...

Follow Us
Follow Us:
  • डॉक्टरांनी तातडीने सिझेरियनचा सल्ला दिल्याचा दावा
  • उपचाराचा खर्च करण्यास सासरच्यांचा नकार दिल्याचा आरोप
  • पतीसह चौघांविरुद्ध पाचोड पोलिसांत गुन्हा
 

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतरही तिला वेळेत उपचार मिळाले नसल्याचा आरोप असून, अखेर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. उपचाराचा खर्च करण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, माहेरच्यांनी उपचाराचा खर्च करण्याची तयारी दर्शवूनही महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू-सासरे आणि नणंदेविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा :Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात

 

डॉक्टरांनी तातडीने सिझेरियनचा सल्ला दिला

स्वाती उर्फ समीक्षा निंबाळकर या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. ६ सप्टेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर त्यांच्या पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे तसेच गर्भातील बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळली गेल्याचे निदर्शनास आले. गर्भातील गुंतागुंत वाढत असल्याने डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन करण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, उपचाराचा खर्च करण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिल्याचा आरोप आहे.

माहेरच्यांनी खर्चाची तयारी दर्शवली, तरी उपचार रखडले

स्वाती यांच्या माहेरच्या मंडळींनी उपचाराचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यानंतरही त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत गेल्यानंतर अखेर २५ सप्टेंबर रोजी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच स्वाती यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पोटातील नऊ महिन्यांचे बाळही दगावले. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते तर परिस्थिती वेगळी राहिली असती का, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली

पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी पाचोड पोलिसांनी स्वाती यांचे पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल निंबाळकर, सासू शारदा निंबाळकर आणि नणंद ऐश्वर्या निंबाळकर (सर्व रा. विहामांडवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वाती यांना सासरच्या मंडळींकडून मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला जात होता का, तसेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास नेमका विलंब का झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील वैद्यकीय परिस्थिती आणि मृत्यूशी संबंधित बाबींचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे विहामांडवा परिसरासह पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Paithan pregnant woman baby death vihamandwa treatment delay case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Crime . Crime News
  • Death Case
  • Pregnant
  • Pregnant woman
  • Woman Died

संबंधित बातम्या

Crime News: ‘पत्नीशी संबंध असल्याचा संशय’; तरुणाला शेतात नेले अन् फरशी-दगडाने ठेचून…
1

Crime News: ‘पत्नीशी संबंध असल्याचा संशय’; तरुणाला शेतात नेले अन् फरशी-दगडाने ठेचून…

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…
2

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!
3

ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!

Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना
4

Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.