(फोटो सौजन्य: Pinterest)
मोठी बातमी ! आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला नाशिकमध्ये अपघात; दोन वाहनांमध्ये झाली धडक
पोलिसांचा तपास सुरु
एएसपी राजकिशोर सिंह यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या सेवनावरून आई आणि मुलामध्ये सतत वाद होत असायचे. प्रकरणाची माहिती मिळताच खजेकलान पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दुल्ली घाटाजवळ पोहचून घटनास्थळावरुन मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. त्यांनी घटनास्थळाचे नीट निरीक्षण केले, एफएसएल टीमनेही घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण तपास केला आणि तिथून सर्व पुरावे गोळा केले. आरोपी मुलगा आणि आजूबाज्याच्या लोकांचीही चाैकशी करुन घटनेसंबंधित आवश्यक माहिती गोळा करण्यात आली. पोलिस सध्या घटनेचा तपास करुन आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच हत्येमागचे नेमके कारण समजून घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
पोलिस अधिकारी करणार अंतिम संस्कार
पोलिसांनी संशयित आरोपी मुलाची चाैकशी केली असून अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही. एएसपी राजकिशोर सिंह यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर वृद्ध महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. शवविच्छेदनानंतर, पोलीस देखरेखीखाली संबंधित महिलेवर पोलिसांकडून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यानंतर संबंधित कलमांअंतर्गत आरोपीवर योग्य ती शिक्षा देण्यात येईल.






