Pimpri-Chinchwad Crime: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
एक अल्पवयीन मुलगी मंदिरात देवाच्या पाया पडायला गेली होती. आरोपीने तिच्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.घटना समोर येताच स्थानिक लोकांनी आरडाओरड केली आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली.
सांगितले जात आहे की आरोपी हा मेट्रोच्या बांधकाम कंपनीत काम करणारा कर्मचारी आहे. तो या भागात कामानिमित्त राहत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला शोधून काढले आणि ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन करण्यात येत आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
मंदिर, शाळा, बाग यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांची सुरक्षा हा मोठा प्रश्न बनला आहे. मंदिरात लोक श्रद्धेने येतात, पण तिथेच अशी घटना घडते हे दुर्दैवी आहे. मंदिर परिसरात सुरक्षा रक्षक नसणे, सीसीटीव्ही असूनही लक्ष ठेवणारे कोणी नसणे यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे. मंदिर ट्रस्टने पण सुरक्षा वाढवली पाहिजे. लहान मुले एकटी मंदिरात येतात, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.
🚨 BREAKING NEWS | ATTEMPTED RAPE OF MINOR GIRL AT TEMPLE IN MAHARASHTRA 🚨 📍 Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra
A shocking incident involving the alleged attempted sexual assault of a minor girl inside a temple in Nigdi, Pimpri-Chinchwad, has come to light. The incident was reportedly captured on CCTV. 🔴 The accused is reportedly an employee of a metro construction company. 🚔 Police Action: Police have taken the accused into custody and registered a case in connection with the incident.
Such incidents raise serious concerns about the safety and security of children in public and religious places. Strict legal action and justice for the victim are essential. #BreakingNews #Maharashtra #PimpriChinchwad #Nigdi #ChildSafety #JusticeForTheVictim #CrimeNews — Riyaz H Khan (@Riyaz_H_Khan) October 12, 2026
Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
या घटनेनंतर निगडी परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे कायदा आणखी कडक करण्याची गरज आहे. बाल हक्क कार्यकर्त्यांनी सांगितले की, अशा घटनांमध्ये पीडित मुलीला न्याय मिळणे खूप महत्वाचे आहे. तिला मानसिक आधार देणे गरजेचे आहे. समाजाने पण अशा घटनांवेळी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
Gadchiroli News: ‘घरी जायचंय’ म्हणाली अन् काही तासांतच मृत्यू; आश्रमशाळेतील घटनेने खळबळ
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या लहान मुलांना एकटे कुठेही पाठवू नका. त्यांना चांगला-वाईट स्पर्श याबद्दल माहिती द्या. काही अनुचित प्रकार घडला तर लगेच पोलिसांना कळवा.सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिस लवकरच कोर्टात आरोपपत्र दाखल करणार आहेत.






