Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात जमिनीच्या वादातून तरुणाचा खून; प्रसार झालेल्या आरोपींना सापळा रचून पकडले

कात्रज भगातील संतोषनगर परिसरात आरोपींनी रविवारी पहाटे तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला होता. पसार झालेल्या आरोपींना २४ तासाच्या आत पोलिसांनी पकडले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 22, 2025 | 02:27 PM
पुण्यात जमिनीच्या वादातून तरुणाचा खून; प्रसार झालेल्या आरोपींना सापळा रचून पकडले

पुण्यात जमिनीच्या वादातून तरुणाचा खून; प्रसार झालेल्या आरोपींना सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जमिनीच्या वादातून तरुणाचा खून करुन पसार झालेल्या आरोपींना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरातून आंबेगाव पोलिसांनी सापळा रचून अटक बेड्या ठोकल्या आहेत. कात्रज भगातील संतोषनगर परिसरात आरोपींनी रविवारी पहाटे तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला होता. पसार झालेल्या आरोपींना २४ तासाच्या आत पोलिसांनी पकडले.

अमर दिलीप साकोरे (वय ४०, रा. संतोषनगर, कात्रज ), मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज), गिरीष सुभाष बाबरे (वय २६, रा संतोषनगर, कात्रज), योगेश बाबुराव डोरे ( वय ३५, रा. खोपडेनगर कात्रज ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, सहायक निरीक्षक स्वाती देवधर यांनी ही कारवाई केली.

पोलिसांची चार पथके

चव्हाण याचा हॉटेल व्यवसाय होता. आरोपी व शुभम चव्हाण यांचा जमिनीवरुन वाद झाला होता. रविवारी पहाटे शुभम कात्रजमधील संतोषनगर परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी सराइत गुन्हेगार साकोरे, किवळे, बाबरे, डोरे यांनी शुभमला बांबूने बेदम मारहाण केली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शुभमचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, पसार झालेल्या आरोपींच्या मागावर पोलिसांची चार पथके होती. तांत्रिक विश्‍लेषणात आरोपी हे मोहोळ येथील कामती गावात असल्याची माहिती मिळाली. तेथील एका हाॅटेलमधून ते जेवण घेण्यासाठी थांबले होते. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस कर्मचारी हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे यांनी सापळा लावून आरोपींना पकडले. खून प्रकरणातील एका आरोपीचे नातेवाईक कामती गावात राहत असल्याची माहिती मिळाली.

Web Title: Police have arrested the accused who fled after murdering a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई
1

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा
2

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले
3

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?
4

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.