Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल; ‘या’ कारणामुळे तरुणाचे संतापजनक कृत्य

प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची व कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 13, 2026 | 03:37 PM
महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल; 'या' कारणामुळे तरुणाचे संतापजनक कृत्य

महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल; 'या' कारणामुळे तरुणाचे संतापजनक कृत्य

Follow Us
Follow Us:

कदमवाकवस्ती : प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची व कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १० एप्रिल) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास हिंगोली येथून करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ३७ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार सुनिल रामप्रसाद मुटकुळे (रा. अकोले, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडिता एका हॉटेलमध्ये चपाती बनविण्याचे काम करून उपजीविका करत असून, तिचे पती चारचाकी वाहन चालक आहेत. सन २०१७ मध्ये हॉटेलमध्ये काम करत असताना तिची ओळख आरोपी मुटकुळे याच्याशी झाली होती. पुढे ही ओळख प्रेमसंबंधात परिवर्तित झाली. काही काळानंतर आरोपी गावी परतला असला तरी दोघांमध्ये फोनद्वारे संपर्क सुरूच होता.

सन २०२१ मध्ये पतीसोबत वाद झाल्यानंतर पीडिता आरोपीकडे संभाजीनगर येथे गेली होती. त्यानंतर सुमारे चार वर्षे ती त्याच्यासोबत राहत होती. या कालावधीत आरोपीने तिच्या परवानगीशिवाय खासगी फोटो व व्हिडिओ चित्रीत केले होते. दरम्यान, आरोपीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पीडिता फेब्रुवारी २०२६ मध्ये पुन्हा आपल्या पतीकडे परतली. यानंतर आरोपीने सूडबुद्धीने सोशल मीडियाचा वापर करून ५ ते ६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करत तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केले. तसेच विविध फेक आयडीद्वारे हे फोटो तिच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यात आले. या प्रकारामुळे पीडिता व तिच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने पीडितेने तक्रार करण्यास टाळाटाळ केली. मात्र, प्रकार सुरूच राहिल्याने अखेर तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधून काढले आणि हिंगोली येथून त्याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, गणेश शिंदे, अमोल जाधव, सागर कदम, गणेश खरात, सागर धायतोंडे, अशोक गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर; पती, सासू-सासऱ्यांसह सात जणांना अटक

Web Title: Police have arrested the accused who posted a womans photo on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर
1

किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?
2

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

Pune Crime: पुण्यात अजब चोरी! कोंबड्यांनाही नाही सुरक्षा; टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्या लंपास
3

Pune Crime: पुण्यात अजब चोरी! कोंबड्यांनाही नाही सुरक्षा; टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्या लंपास

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…
4

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.