Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोसरीत पोलिसांची मोठी कारवाई; शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना खंडणी विरोधी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 18, 2026 | 12:30 AM
भोसरीत पोलिसांची मोठी कारवाई; शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

भोसरीत पोलिसांची मोठी कारवाई; शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:
  • भोसरीत पोलिसांची मोठी कारवाई
  • शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
  • ५ लाख १६ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना खंडणी विरोधी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन रिक्षा, दोन कोयते, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख १६ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यांतील गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. पवन छगन उजगरे (वय २६, रा. समता कॉलनी, काळेवाडी, पुणे) आणि २) सुमित हनुमंत कराड (वय २८, रा. ज्ञानेश्वरी पार्क, दिघी रोड, भोसरी, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी सुरज ज्ञानेश्वर शेलार यांचे पैशांच्या मागणीसाठी अपहरण झाल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत असताना, हे आरोपी भोसरी एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या मैदानात दोन रिक्षांसह थांबलेले आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला, मात्र आवश्यक बळाचा वापर करून त्यांना जेरबंद करण्यात आले. तपासात असे समोर आले की, याच आरोपींनी १५ मार्च रोजी नाशिक फाटा येथून नितीन महाजन यांना रिक्षामध्ये बसवून कोयत्याचा धाक दाखवत त्यांचे अपहरण केले होते आणि त्यांच्याकडून फोन पे द्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे आणि प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या पथकामध्ये खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक सुनील भदाणे, अमर राऊत, सहायक उपनिरीक्षक सुनील कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुन्हाडे, चंद्रकांत जाधव, किशोर कांबळे, दादाभाऊ साबळे आणि भरत गाडे यांचा समावेश होता.

हे सुद्धा वाचा : नर्सची गळफास घेऊन आत्महत्या, जातीवाचक शिवीगाळ अन्….; सिडको ठाण्यात गुन्हा नोंद

Web Title: Police have arrested thieves who robbed citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

अडीच कोटींच्या सोन्यावर डल्ला? कलकत्त्यात दागिने बनविण्याच्या बहाण्याने 3.98 किलो सोने घेऊन सहा जण फरार
1

अडीच कोटींच्या सोन्यावर डल्ला? कलकत्त्यात दागिने बनविण्याच्या बहाण्याने 3.98 किलो सोने घेऊन सहा जण फरार

कर्जबाजारीपणामुळे पिस्तूल विक्रीचा मार्ग निवडला; सराईत गुन्हेगाराला पहिल्याच व्यवहारापूर्वी ठोकल्या बेड्या
2

कर्जबाजारीपणामुळे पिस्तूल विक्रीचा मार्ग निवडला; सराईत गुन्हेगाराला पहिल्याच व्यवहारापूर्वी ठोकल्या बेड्या

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट
3

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…
4

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.