Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई

घरगुती गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात असताना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 04, 2026 | 06:03 PM
महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई

महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पिंपरी : घरगुती गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात असताना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने खराबवाडी येथे छापा टाकून तब्बल ८१ गॅस सिलिंडर जप्त केले. या कारवाईत एक लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सचिन प्रकाश म्हस्करे (३१, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) याला अटक करून एका १६ वर्षीय विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय गणेश भारत गॅस कार्यालयासमोरील, हनुमान मंदिराच्या विरुद्ध बाजूस असलेल्या खराबवाडी परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी सचिन म्हस्करे आणि एका १६ वर्षीय विधी संघर्षित बालकाच्या ताब्यातून ८१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून विक्रीसाठी हा साठा करून ठेवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ च्या कलम ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

घरगुती एलपीजी गॅस हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला जीवनावश्यक घटक मानला जातो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा अवैध साठा करून त्याचे रिफिलिंग व विक्री केली जात असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही भागांत नागरिकांना सिलिंडर मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गॅसचा बेकायदा साठा करून त्याचा गैरवापर होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा : ट्वीशा शर्मा प्रकरणाची पुनरावृत्ती! 3 कोटींच्या हुंड्यानंतर केली 2 कोटींची मागणी, मुलीने संपवलं आयुष्य; सैनिक नवऱ्यावर FIR दाखल

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, अमर कदम, विनोद वीर, गणेश सावंत आणि विशाल गायकवाड यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

“जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, काळाबाजार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित अवैध व्यवसायांविरोधात गुन्हे शाखेच्या माध्यमातून सातत्याने कारवाया सुरू आहेत. अशा प्रकारे अवैध गॅस रिफिलिंग करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.” — संजय चव्हाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड)

Web Title: Police have detained those illegally storing cylinders in mahalunge midc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई
1

घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई

‘रॉ अधिकारी’ असल्याचे सांगून सव्वाचार लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले
2

‘रॉ अधिकारी’ असल्याचे सांगून सव्वाचार लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले

पुण्यातील तोतया पत्रकाराला बेड्या, महिला पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
3

पुण्यातील तोतया पत्रकाराला बेड्या, महिला पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

12 दिवस, 25 कॅमेरे अन् हाती लागला आरोपी; शेवटच्या फोन कॉलने उलगडले तरुणाच्या खुनाचे गूढ
4

12 दिवस, 25 कॅमेरे अन् हाती लागला आरोपी; शेवटच्या फोन कॉलने उलगडले तरुणाच्या खुनाचे गूढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.