ही बातमी आहे सायको मुलाची. आपली आई ही आपल्या मुलांसाठी जगातील सगळ्यात मोठ सर्वस्व आहे. आईशिवाय मूल राहू शकत नाहीत. पैशावरून , जमिनीवरून भांडण झाल्यावर आई किवा मुला मुलीतील संघर्ष आपण ऐकला आहे. ही घटना ही अशीच आहे. एका मुलाच्या खोलीत त्याच्या आईचा मृतदेह हा घरात आढळून आला आहे. धक्कादायक म्हणजे ८ वर्ष आईच्या मृतदेहसोबत मुलगा घरातून आतून टेप लावत स्वतःला घरात कोंडून घेतलं होत. मात्र जेव्हा ६ तारखेला घरात काही तरी वास आहे हे कळाल तेव्हा शेतकऱ्यांनी फायर ब्रिगेडला बोलावलं. दार उघडताच ४३ वर्षाचा कुरूप झालेला मुलगा बाहेर आला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
क्रेन बाजूला घेण्यावरून वाद, टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
घरात ठेवला आईचा मृतदेह
पोलिस जेव्हा घटनास्थळावर आले तेव्हा यांना समजलं की आईचा मृतदेह तसंच पडून होता. घरातून दुर्गंधी वास येत होता. ८० वर्षीय अँटोनियाचा मृतदेह सगळ्यांना पाहायला मिळाला. शेजारच्या लोकांनी प्रतिक्रिया दिली या मुलाला आम्ही अनेक वर्ष घरच्या बाहेर कधी ही पहिल नाही. जेवियर अस या मुलाच नाव आहे. त्याने घरात काय केल. आईचा मृत्यू कसा झाला आहे. हे पोलीस तपासात समोर आल. या मुलाला आईच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. आईच्या शरीरावर हिंसक खुणा आढळून आल्या आहेत. सध्या त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र अजून पोलिसांचा अंतिम अहवाल अजून आला नाही त्यामुळे याची स्पष्टता अजून आलेली नाही. मात्र या घटनेने पोलिसांना ही धक्का बसला आहे.
बाथरूम मध्ये रक्ताचे डाग आणि रेडिओ सुरू
पोलिसांना तपास करत असताना बाथरूम मध्ये रक्ताचे डाग आढळून आले. बाथरूम मध्ये हत्या करून पुन्हा मृतदेह खाटवर ठेवला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या प्रकरणांचा तपास आता पोलीस करतील. मात्र आश्चर्य म्हणजे जेवियरच वय ४३, आई ८० वर्ष म्हणजे आईची हत्या केली की नैसर्गिक मृत्यू याचा शोध सुरू आहे. रेडिओ पोलिसांना मिळाल तो सुरूच होता. आईला कदाचित रेडिओ ऐकण्याची सवय असेल आणि आईच्या आठवणीत त्याने कोंडून घेतलं असाव असा संशय आता व्यक्त केला जात आहे.