Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: तुळापूरच्या बंगल्यात रंगली हायप्रोफाईल रेव पार्टी; दारूच्या एका बॉटलची किंमत ६५ हजार! कोट्यवधींचा DJ आणि…

पुण्याजवळील तुळापूर येथील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत लाखो रुपयांचा मद्यसाठा, गांजा आणि हुक्का पॉट जप्त करण्यात आले. पार्टीत १५६ जण सहभागी असल्याची माहिती असून ७८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 08, 2026 | 02:41 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तुळापूरमधील शिवसंस्कृती बंगल्यात रेव पार्टीवर पोलिसांची धाड.
  • साडेनऊ लाखांची दारू, गांजा आणि हुक्का पॉट जप्त.
  • १५६ जण पार्टीत सहभागी, मात्र ७८ जणांवरच गुन्हे दाखल.
पुणे: पुण्याजवळील तुळापूर येथे एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, गांजा आणि हुक्का पॉट जप्त करण्यात आले असून तब्बल ७८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्टीत सुमारे १५६ जण सहभागी असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांना काय मिळाला रेव्ह पार्टीत

मिळालेल्या माहितीनुसार, तुळापूर येथील शिवसंस्कृती बंगल्यात ही रेव पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये अनेक तरुण-तरुणी मद्याच्या नशेत बेभान झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, या पार्टीत जवळपास ४९ तरुणी सहभागी असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांना या ठिकाणी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा, गांजा आणि दोन हुक्का पॉट आढळून आले.

Satara Crime: ‘Good Bye All Of You…’ स्टेटस ठेवत महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सहकाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

दारूची एक बॉटल ६५ हजार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची किंमत साडेनऊ लाख रुपयांच्या घरात आहे. काही विदेशी मद्याच्या बाटल्यांची किंमत ६५ ते ७० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, पार्टीमध्ये वापरण्यात येणारा सुमारे एक कोटी रुपयांचा डीजे सेटअपही पोलिसांना आढळून आला. घटनास्थळावरून सुमारे ४ ग्रॅम गांजाही जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी २९ जणांची रक्त चाचणी केली असून, अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधितांविरोधात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पार्टीत १५६ जण सहभागी असताना केवळ ७८ जणांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सुषमा अंधारेंनी उपस्थित केले प्रश्न चिन्ह

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर पार्टीत १५६ जण सहभागी होते, तर गुन्हे फक्त ७८ जणांवरच का दाखल करण्यात आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, संभाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या तुळापूरमध्ये अशा प्रकारच्या पार्ट्या होणे दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली.

पोलीस आयुक्तांचा कठोर कारवाईचा इशारा

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी जवळपास ३० जणांना नोटिसा बजावल्या असून, त्यांना लोणीकंद पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचा इशारा दिला असून, पुढील तपास सुरू आहे.

Parali Crime : तु माझ्याबरोबर पळून चल, नाहीतर मी…; परळीतील संतापजनक प्रकार

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी कारवाई कुठे केली?

    Ans: पुण्याजवळील तुळापूर येथील शिवसंस्कृती बंगल्यावर कारवाई करण्यात आली.

  • Que: पोलिसांना कारवाईदरम्यान काय आढळले?

    Ans: मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, गांजा, हुक्का पॉट आणि महागडा डीजे सेटअप आढळला.

  • Que: सुषमा अंधारे यांनी कोणता सवाल उपस्थित केला?

    Ans: पार्टीत १५६ जण सहभागी असताना गुन्हे फक्त ७८ जणांवरच का दाखल करण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Pune crime high profile rave party held at a bungalow in tulapur a single bottle of liquor cost 65000 a dj setup worth crores and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.