
crime ( फोटो सौजन्य - social media)
द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग!
आंबेगाव परिसरात पुणे सातारा रोडवर हा सगळा प्रकार सुरू होता. यामध्ये द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये या महिलांकडून हा व्यवसाय करून घेतला जात होता. ११ तारखेला सामाजिक सुरक्षा सेलला याची माहिती प्राप्त झाली आणि त्या नंतर पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली आणि महिलांना ताब्यात घेतलं आहे.
कसा घेतला महिलांचा शोध ?
ज्यावेळी पोलिसांना ही माहिती मिळाली तेव्हा याची आधी खात्री करण्यात आली होती. गोपनीय बातमीदारामार्फत ही माहीती प्राप्त झाली आणि त्या नंतर पोलिसांनी छापा करायच ठरवलं. सुरुवातीला पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केले. पैसे देवून शरीर सुख घेण्याच्या बहाण्याने त्यांना पाठविण्यात आल आणि मागून पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये चार महिला पोलिसांच्या हाती लागल्या आणि या मधील आरोपी ज्यांच्याकडून हा कृत्य करून घेत होता. सचिन गायकवाड (वय २८) याला ताब्यात घेण्यात आल आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात बीएनएस १४३ (१) (३) ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
पुण्यात आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. शहरात नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाल आहे. मात्र आज अप्पर डेपो परिसरात भीषण आग लागली होती. या आगीत मंडपाचं साहित्य सगळं जळून खाक झाल आहे. दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास कंट्रोल रूमला आग लागल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला दोन गाड्या पाठवण्यात आल्या होत्या, मात्र गोडावूनमध्ये मंडपाचं साहित्य होत त्याने एवढा पेट घेतला मी सगळं साहित्य जळून खाक झाल. अग्निशम दलाच्या जवळपास १० गाड्या नंतर बोलवाव्या लागल्या आणि अर्धा तास आगीचे लोट बाहेर पडत होते. अप्पर डेपो परिसरात दाट लोकवस्ती आहे. बाजूला अनेक दुकान होती त्यांना आग लागण्याची भीती निर्णय झाली होती. मात्र शेवटी अर्धा तास दहा गाड्या घटनास्थळी होत्या. त्यांनी आग आटोक्यात आणली.
Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
Ans: ही कारवाई आंबेगाव परिसरात झाली.
Ans: पोलिसांनी चार महिलांची सुटका केली.
Ans: सचिन गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले.