
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
शनिवारच्या रात्री तुळापूर येथील एका बंगल्यात मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी एकत्र जमल्याची आणि तिथे अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहिती मिळताच क्राईम ब्रँचच्या तब्बल 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास या बंगल्याला वेढा घातला आणि अचानक छापा टाकला. तिथे पोलिसांना नशेच्या अवस्थेत काही तरुण तरुणी आढळून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोणतीही परवानगी न घेता तिथे विनापरवाना मद्यविक्री सुरू होती, तसेच हाय-डेसिबल साऊंड सिस्टिमचा वापर करून मध्यरात्रीपर्यंत धांगडधिंगा सुरू होता. एवढेच नाही तर पोलिसांनी घटनास्थळावरून नशेसाठी वापरले जाणारे काही संशयास्पद पदार्थ जप्त केले आहेत. हे संशयास्पद पदार्थ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
अश्या हाऊस पार्टीसाठी पोलीस आणि एक्साईज (Excise) विभागाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. आयोजकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून या पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीमध्ये तरुण- तरुणींसह या ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीच्या मुख्य आयोजकांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा ड्रग्ज आणि बेकायदेशीर पार्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.
परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरात नुकतीच घडलेली विषारी दारू दुर्घटना लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध आणि बनावट मद्याच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईत तब्बल १ कोटी ८९ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Ans: या पार्टीला “प्रोजेक्ट एक्स” असे नाव देण्यात आले होते.
Ans: पोलिसांनी सुमारे 60 ते 70 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे.
Ans: अमली पदार्थांचा वापर, विनापरवाना मद्यविक्री आणि मोठ्या आवाजातील डीजे सिस्टीम आढळली.