सियाने गुगलवर सर्च काय केलं?
केतन अग्रवालच्या हत्येचा कट सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने रचला. लोहगडावरुन ढकलण्याआधी सियाने केतनच्या हत्येचा कट गुगलवर सर्च करुन शिजवला, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिच्या मोबाईलमध्ये त्या अनुषंगाने काही पुरावे आढळले आहेत. गुगलवरुन घेतलेल्या माहितीच्या आधारे केतनची हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय, असं ही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, घटनेला पूर्णत्वास आणण्यापूर्वी चेतन आणि सिया एका कॅफेमध्ये भेटले आणि केतन अग्रवाल याला कसं मारायचं याचा प्लॅन बनवला. लोहगडावर कुठला पॉईंटवरुन केतनला ढकलले जाऊ शकते याचा प्लॅन दोघांनी आखला आणि १८ जून रोजी कटानुसार केतनची हत्या केली.
Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी
साप आला साप आला…
4 जूनला लोहगडावर आला नाही, म्हणून कडाक्याचे भांडण केलं होत. १४ जूनला लोहगडावर जाण्याचा सियाने हट्ट धरला. वडिलांनी नाईलाजास्तव परवानगी दिली. ते लोहगडावर गेले. साप आला, साप आला असं नाटक करुन सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्येचा दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला.
केतनला आधीच संशय होता
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, केतनला सियाच्या वागण्याबद्दल आधीपासूनच शंका होती. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यापासून सिया बहुतांश वेळ फोनवर व्यस्त असायची आणि त्यावरून दोघांमध्ये अनेकदा किरकोळ वाद व्हायचे. केतनने कुटुंबाकडे चेतन चौधरी याच्या नावाचा उल्लेखही केला होता आणि सियाच्या चारित्र्याबद्दल पडताळणी करण्याची विनंती केली होती. कौटुंबिक ओळखीचे हे स्थळ असल्याने मी केतनला काळजी न करण्याचा सल्ला दिला आणि त्याचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही,” अशी खंत त्याच्या वडिलांनी व्यक्त केली.
कोण आहे सिया गोयल?
सिया गोयल ही पुण्यातील व्यावसायिक प्रवीण गोयल यांची कन्या आहे. सिया गोयल ही २० वर्षाची असून वाडिया कॉलेजमध्ये बी-कॉम शिक्षण ही घेत आहे. गोयल कुटुंबीयांचा ड्राय फ्रुटस-मसालेचा व्यवसाय आहे. तर सियाला मात्र मार्केटयार्ड परिसरात केक विक्रीची बेकरी टाकून देण्यात आली आहे.
Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचा मृत्यू झाला.
Ans: केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांची चौकशी सुरू आहे.
Ans: पोलिस मोबाईल, सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.






