पुण्यातील मुलीवर शिक्रापूरमध्ये अत्याचार (फोटो- istockphoto )
शिक्रापूर: राज्यात गेल्या कही दिवसांत महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असाच एक प्रकार पुण्याच्या शिरूरध्ये घडला आहे. शिरुर येथील योगेश धनवडे याची पुण्यातील एका युवतीशी ओळख झाली. त्यानंतर योगेश याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीला वारंवार स्वतःच्या घरी बोलावले. तसेच हॉटेलवर बोलावून युवतीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्यानंतर युवतीने लग्नाबाबत चर्चा केली. त्यानंतर मात्र युवतीला शिक्रापूर मध्ये बोलावत मी तुझ्याशी लग्न करणार नाही म्हटल्याने युवतीने पोलिसांत देईन असे सांगितले. हे ऐकल्यानंतर योगेशने युवतीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.
याबाबत पिडीत युवतीने शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी योगेश राजेंद्र धनवडे रा. मनीषा विहार बिल्डींग शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध १६ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश फरार झाला. योगेश हा औरंगाबाद येथून यवतमाळला जाणार असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस नाईक सुजित जगताप यांनी थेट छत्रपती संभाजीनगर गाठले. त्या ठिकाणी पोलिसांनी योगेशच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.
धमक्यांना कंटाळून तरुणीचं टोकाचं पाऊल
जालना जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रियकराच्या बदनामीच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आला आहे. तरुणीचा मृतदेह प्रियकराच्या घरी आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शिवानी गिरी असे या मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल आघामसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
शिवानीला तिचा बॉयफ्रेंड विशाल आघाम याने तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली येऊन तिने आत्महत्येचं टोकाचा पाऊल उचलल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात भोकरदन पोलीस ठाण्यात विशाल आघामसह आणखी चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजार केलं असता न्यायालयाने चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शिवणीच्या नातेवाईकांकडून ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा गंभीर आरोप केला करण्यात येत आहे. यामुळे हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या, याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे.