Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर

नशा करताना मित्रासोबत वाद झाला अन् काही वेळातच त्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला. धक्कादायक म्हणजे खून केल्यानंतर आरोपी घरी गेला, कपडे बदलले आणि थेट खडक पोलीस ठाण्यात पोहोचला; ‘मीच खून केला’ अशी कबुली देत त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 04, 2026 | 05:21 PM
Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर

Follow Us
Follow Us:
  • नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून
  • काशेवाडीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला आकाश पाटोळे
  • खून केल्यानंतर कपडे बदलून आरोपी स्वतःच पोलिसांत हजर

पुणे : नशा करताना झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केल्याची धक्कादायक घटना भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात घडली. खून केल्यानंतर आरोपी घरी गेला, कपडे बदलले आणि त्यानंतर स्वतःहून खडक पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आकाश उर्फ अक्क्या उर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (३०, रा. महात्मा फुले मित्र मंडळाजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र अजय उर्फ चोर राजा सुखदेव शिंदे (३०, रा. काशेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. रुपाली प्रमोद पाटोळे (३०) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

मित्रांसोबत घराबाहेर पडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली पाटोळे या जुन्या मोटार स्टँड परिसरात शेंगा आणि कणीस विक्रीची गाडी लावतात. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी आकाश घरी झोपला होता. झोपेतून उठल्यानंतर आंघोळ करून तो घरात बसला होता. त्याचवेळी त्याचे मित्र शंभू आणि अबिद घरी आले. त्यांच्यासोबत आकाश घराबाहेर पडला.

रक्ताच्या थारोळ्यात आढळला

रात्री साडेआठच्या सुमारास काशेवाडीतील वजनकाट्याजवळील एका सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर आकाश रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडल्याचे एका स्थानिकाच्या निदर्शनास आले. त्याने याची माहिती रुपाली यांना दिली. रुपाली घटनास्थळी पोहोचल्या असता आकाश गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा: कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

खून केल्यानंतर स्वतःच पोलिसांत

घटनेची माहिती देण्यासाठी रुपाली खडक पोलीस ठाण्यात गेल्या असता, त्याचवेळी आकाशचा मित्र अजय उर्फ चोर राजा स्वतःहून पोलीस ठाण्यात आला. नशा करताना आकाशसोबत वाद झाल्याचे आणि त्या वादातून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. खून केल्यानंतर घरी जाऊन कपडे बदलले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे अजयने पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक राकेश जाधव करत आहेत.

Web Title: Pune kashewadi friend murder drug dispute accused surrenders khadak police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Murder Case
  • Pune crime news in marathi
  • pune murder news

संबंधित बातम्या

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
1

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
2

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ला थेट ठोकले सील
4

आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ला थेट ठोकले सील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.