Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: १३ तोळे सोने अन् कोटीच्या घराची मागणी; छळाला कंटाळून आयटी अभियंता विवाहितेने केली आत्महत्या

पुण्यातील केशवनगर येथे ३३ वर्षीय आयटी अभियंता विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसह सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पती, सासू, सासरे, नणंद आणि आजेससू यांना जबाबदार ठरवल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 13, 2026 | 11:29 AM
Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत

Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत

Follow Us
Follow Us:
  • त्रिष्णा सकपाळ यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा
  • पतीसह सासरच्या पाच जणांवर छळाचा आरोप
  • चिठ्ठीत सासरच्यांना मृत्यूस जबाबदार ठरवल्याचा दावा
 

पुणे : पतीसह सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून केशवनगर येथील ३३ वर्षीय आयटी अभियंता विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्रिष्णा राहुल सकपाळ असे मृत विवाहितेचे नाव आहे. मृत्यूपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत पती, सासू, सासरे, नणंद आणि आजेससू यांच्या त्रासाला कंटाळल्याचे नमूद केल्याचा दावा पोलिस तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पगार आणि माहेरच्या सदनिकेसाठी छळाचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिष्णा यांचा विवाह २०१८ मध्ये राहुल संजय सकपाळ यांच्याशी झाला होता. लग्नावेळी त्यांच्या माहेरच्यांनी १३ तोळे सोन्याचे दागिने दिले होते. त्रिष्णा एका आयटी कंपनीत नोकरीला होत्या. सुरुवातीला वैवाहिक जीवन सुरळीत होते. मात्र, काही काळानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांच्या संपूर्ण पगाराची मागणी करण्यात आली. तसेच माहेरची सदनिका सासूच्या नावावर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांच्या नावावर एक कोटी रुपयांची सदनिका घेऊन देण्यासाठीही तगादा लावला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मागण्यांवरून त्यांना वारंवार मारहाण आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

वेगळे राहूनही छळ सुरूच असल्याचा आरोप

कथित छळामुळे त्रिष्णा आणि राहुल हे २०२१ मध्ये केशवनगर येथे स्वतंत्र राहू लागले. मात्र, त्यानंतरही पतीकडून त्रिष्णा यांचा छळ सुरू असल्याचा आरोप आहे. वेगळे राहत असतानाही मारहाण करून त्यांना घराबाहेर काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्रिष्णा माहेरी गेल्या. दरम्यान, राहुल यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याने त्रिष्णा यांना मोठा धक्का बसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचा दावा

२९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्रिष्णा यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पती, सासू, सासरे, नणंद आणि आजेससू यांच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या मंडळींना आपल्या मृत्यूस जबाबदार धरल्याचेही चिठ्ठीत नमूद असल्याचे पोलिस तक्रारीत सांगण्यात आले आहे. या प्रकरणी त्रिष्णा यांचे वडील बाळकृष्ण निकम (वय ७४, रा. केशवनगर) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजेससू शकुंतला साळुंखे (सर्व रा. डिफेंस कॉलनी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  प्रकरणाचा पुढील तपास मुंढवा पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Pune keshavnagar it engineer woman death husband in laws case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Engineering
  • Latest pune news update
  • Mundhwa
  • pune crime case
  • woman

संबंधित बातम्या

Crime News: गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट
1

Crime News: गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…
2

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…
3

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…

मृत्यूपूर्वी आई-बहिणीला सांगितलं पोलिस ठाण्यात काय घडलं; 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात खळबळ
4

मृत्यूपूर्वी आई-बहिणीला सांगितलं पोलिस ठाण्यात काय घडलं; 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.