
crime ( फोटो सौजन्य - social media)
तीन यंत्रणा अलर्ट मोडवर
जेव्हा ही घटना घडली तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली. मात्र मध्यरात्री एटीएस पथक दाखल झालं आणि त्यांनी पाहणी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वस्तू आढळून आल्यानंतर पण रुग्णालयातील रुग्णांना हलवल नाही. मात्र जेव्हा पोलीस दाखल झाले तेव्हा त्यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पुण्याचे पोलीस अमितेश कुमार हे घटनस्थळावर दाखल झाले होते. त्यांनी लो ग्रेडेड असल्याचं सांगितल आणि तो निकामी केल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
संशयित व्यक्तीला घेतलं ताब्यात
जेव्हा संध्याकाळी घटना घडली. त्या आधी कोण कोण व्यक्ती इथे आल्या होत्या. त्यांची चौकशी सुरू केली आणि एका सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल. मात्र तो व्यक्ती एम आर असल्याचं निष्पन्न झाल. आता पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटल सारख्या ठिकाणी अशा वस्तू नेल्या कशा? हा सवाल आहे. तेव्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक नक्की काय करत होते. रुग्णालयात सुरक्षा का नव्हती असे सवाल उपस्थित झाले आहेत. मात्र या घटनेने पुणे पोलीस अलर्ट मोडवर काम करत आहेत. सगळ्या बाजूने याचा तपास केला जात आहे.
हॉस्पिटलच्या एमडीनेच वस्तू हाताने खाली आणून ठेवली
जेव्हा एक वस्तू इथे पडली आहे अस मावशीने सांगितल, तेव्हा डॉक्टर आले आणि त्यांनी रिकाम्या बॉक्स मध्ये ती वस्तू खाली आणून ठेवली. त्यानंतर त्यांनी पोलीस कंट्रोलला फ़ोन केला. मात्र वस्तू खाली आणताना भीती वाटली नाही. अस विलास गायकवाड यांनी सांगितल आम्ही पोलीस जे जे काही विचारतील तेव्हा सहकार्य करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हडपसर पोलीस, गुन्हे शाखा आणि एटीएस असा तीन यंत्रणा याचा तपास करत आहेत.
Ans: पुण्यातील हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली.
Ans: पोलिसांनी बॉम्बसदृश्य वस्तू ताब्यात घेऊन मोकळ्या मैदानात निकामी केली.
Ans: हडपसर पोलीस, गुन्हे शाखा आणि ATS या तीन यंत्रणा तपास करत आहेत.