पुणे: पुण्यातील कोथरूडमध्ये गोळीबार केल्यानंतर निलेश घायवळ गँगच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळायला सुरुवात केली . निलेश घायवळ हा परदेशात फरार झाला होता . त्याचा पासपोर्ट सुद्ध रद्द करण्यात आला . मात्र निलेश घायवळ कुठे आहे ? याचा शोध मात्र पुणे पोलिसांत लागत नव्हता . निलेश घायवळ च्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस पण इश्यू करण्यात आली होती . लंडनला त्याचा मुलगा शिकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी युके हाय कमिशनला पत्र लिहिल होत . या पत्रात त्यांनी निलेश घायवळ ची माहिती द्या अशी मागणी केली होती . त्यानंतर आज पहाटे पुणे पोलिसांना नितेश घायवळ हा लंडनला असल्याचं सांगण्यात आल आहे
बिर्हामणे टोळीतील सराईत गुन्हेगाराला बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
पत्रात काय म्हटल आहे ?
निलेश घायवळ हा लंडनमधे आहे .त्याचा ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा विसा आहे . त्याचा मुलगा हा लंडनमध्ये शिकत आहे अशी माहिती हाय कमिशन ने दिली आहे . स्थानिक पोलिसांनी चौकशी करून आमच्या ताब्यात द्याव अशी मागणी पुणे पोलिसांनी केली आहे . निलेश घायवळ याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे . निलेश घायवळ हा नक्की कुठे आहे याची माहिती द्या . एस पत्र पुणे पोलिसांनी दिल आहे
लंडन मधून ताब्यात घेणार का ?
निलेश घायवळ हा लंडन मध्ये असल्याचं तर आता स्पष्ट झाल आहे . मात्र त्याला ताब्यात घेतलं जात का ? हे पाहणे महत्वाच्या असणार आहे . निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या दोन्ही भावांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . घायवळ टोळीवर मोक्का सारखी कारवाई करण्यात आली आहे .जमिनीची कागदपत्र , बँक अकाउंट सील करण्यात आल आहे . निलेश घायवळ याला ताब्यात देण्यात याव अशी मागणी केली आहे . अखेर निलेश घायवळ याचा शोध लागल आहे . निलेश घायवळ ला प्रत्यर्पण केल जात का ? हे पहावे लागेल
पुण्यात भरदिवसा चोरट्यांचा सुळसुळाट; वृद्धाला एकटे गाठले अन्…
पाषाण परिसरातील साई चौकातून पायी निघालेल्या वृद्धाला गाठून दुचाकीवरील दोघांनी हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास केल्याची घटना घडली आहे. ओळखीचे असल्याचे भासवून दोघांनी ही लुट केली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने तक्रार दिली आहे. रविवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास पाषाण साई चौकाजवळील रोडवर ही घटना घडली आहे.






