फोटो सौजन्य - Social Media
स्वयंवरात द्रौपदीला अर्जुनाने जिंकले पण “आई भिक्षा आणलेय” या वाक्याने द्रौपदीला पाच जणांमध्ये वाटून घ्यावे लागते. तितके ठीक आहे पण जेव्हा शास्त्रागारात द्रौपदी पाच भावांपैकी एका भावासोबत असते तेव्हा बाकी चार भावांना आत येण्याची बंदी असते. जर कोणी येईल तर त्याला एक वर्षाचा वनवास भोगावा लागेल असा एक नियम त्या पाची पांडवांनी काढला होता. पण काही कारणाने अर्जुनाला ते नियम तोडावे लागले. शस्त्रागारात युद्धीस्थिर आणि द्रौपदी एकत्र असताना अर्जुन आत शिरतो त्यामुळे त्याला वनवास भोगाव लागतो. दरम्यान तो हिमालयात जाऊन पोहोचतो. तिथे स्वतः प्रभू शंकर राहतात. ते सिंधू संस्कृतीचे कपडे परिधान करून असल्यामुळे अर्जुन ला त्यांची ओळख पटत नाही. दोघांना एकच शिकार शिकारीसाठी मिळतो त्यानंतर त्या दोघांमध्ये युद्ध होते. युद्धात प्रभू शंकर अर्जुनावर प्रसन्न होतात आणि त्याला स्वर्गात जाण्याचा मार्ग सांगतात.
पण अर्जुनाला स्वर्गात कसे जावे? हेच ठाऊक नव्हतं. अजून स्वतः स्वर्गराज इंद्राचा पुत्र! पण त्याला स्वर्गवाटेची माहिती नव्हती. तेव्हा स्वर्गातून एक रथ त्याला नेण्यासाठी येतो. रथाचा सारथी सोबत असतो. महत्वाचे म्हणजे अर्जुन कोणताही मंत्रोपचाराशिवाय स्वर्गात जातो. त्या रथातून जात असताना त्याला पृथ्वीवरची दृश्य लहान लहान होत असताना दिसत जातात म्हणजे एकंदरीत तो आकाशाकडे निघून जातो. यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की स्वर्ग नावाचे एक ठिकाण आहे जे आकाशात आहे. त्या कथेत असेही सांगितले आहे की सारथीशी अर्जुन बोलत असताना सारथी त्याला सांगतो की आकाशात जे शेकडो विमान दिसत आहेत ते सगळे इतर लोकांहून स्वर्गाकडे भ्रमंती करणाऱ्यांचे रथ आहेत.
ते पाहून अर्जुन आश्चर्य होतो. मुळात ही गोष्ट आपल्यालाही आश्चर्यचकित करणारी आहे कारण यामधून आपल्याला स्वर्ग नावाचा आकाशात एक ग्रह असल्याचा भास होतो जिथे जाण्यासाठी स्वर्गातून एक विमान अर्जुनाला नेण्यासाठी पृथ्वीतलावर आला आणि त्याला आकाशात उंच उडून स्वर्गात घेऊन गेला.
स्वर्गात अर्जुन विविध शस्त्र आणि अस्त्रकला शिकतो. इंद्राकडून आशीर्वाद घेतो तसेच तेथील सगळं काही अनुभवल्यानंतर इंद्राला प्रश्न करतो की वडील स्वर्गात असं काही शिल्लक आहे का जे मी अनुभवलं नाही. तेव्हा इंद्रताला अप्सरांकडून नृत्य शिकण्याचे आवाहन करतो आणि याच नृत्याचा फायदा अर्जुनाला अज्ञात वसात होतो.






