पुण्यातील पालिकेच्या अधिकाऱ्यांवर बनावट डिग्री प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुणे महानगर पालिकेतून धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांचा मोठा कारनामा समोर आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीची ‘एमबीए’च्या बनावट डिग्रीचे मार्कलिस्ट तयार करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी व लिपिकांनी साथ दिल्याच्या आरोपांवरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणामध्ये पुणे महानगर पालिकेचे उपायुक्त सोमनाथ हरिभाऊ बनकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे आणि लिपिक राजेंद्र घारे व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोमनाथ बनकर हे सध्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर रामचंद्र आल्हाट (वय 54, रा. तानाजीवाडी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार पुणे महापालिका कार्यालय येथे 1 जानेवारी 2008 ते जानेवारी 2016 दरम्यान घडला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असलेले सोमनाथ बनकर हे 2008 मध्ये महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलचे रेक्टर होते. त्यावेळी त्यांनी सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटी येथून 2008 व 2009 या शैक्षणिक वर्षांमध्ये एमबीएची बनावट डिग्री प्राप्त केली. तसेच, स्वत:च्या सेवा पुस्तिकेत नोंद करुन घेतली. त्यात तत्कालिन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे आणि लिपीक राजेंद्र घारे यांनी संगणमताने साथ दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारदार आल्हाट यांनी या सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीमध्ये माहिती अधिकारात अर्ज केला होता. 27 डिसेंबर 2016 रोजी सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीने सोमनाथ बनकर नावाच्या कोणत्याही विद्यार्थ्याने पदवी घेतली नसून ही पदवी बनावट असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत करत आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर ४० तडीपार गुंडांना पोलिसांनी पकडले
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून गुंडाचा वापर केला जात असल्याचा आरोप होत असतानाच पुण्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास ४० तडीपार गुंडांना पुणे पोलिसांनी पकडले आहे. त्यात पुण्यात ऐन निवडणुकीच्या काळात अन् प्रचाराच्या धामधुमीत हे तडीपार गुंड शहरात हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आरोपींमध्ये तथ्य असल्याचे दिसते. राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोपी-प्रत्यारोप होत आहेत. हे सुरू असतानाच राजकीय पक्ष तसेच उमेदवार गुंडांचा वापर करत असल्याचाही आरोप होत आहे. दरम्यान निवडणूकीत शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगत काम केले जात आहे. त्यामध्ये बेकायदा हत्यारे बाळगणाऱ्या गुंडांसह तडीपार गुंडावर नजर ठेवली जात असून, त्यांना चाप लावण्यात येत आहे.