Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नशेसाठीची बंटा गोळी विकणाऱ्याला ठोकल्या बेड्या; शिवणेतून घेतले ताब्यात

नशेसाठी खाण्यात येणाऱ्या तसेच छुप्या पद्धतीने पण सहजरित्या बाजारात उपलब्ध होणारी भांगयुक्त ‘बंटा’ गोळी विकणार्‍या एकाला गुन्हे शाखेने पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 22, 2025 | 12:41 PM
नशेसाठीची बंटा गोळी विकणाऱ्याला ठोकल्या बेड्या; शिवणेतून घेतले ताब्यात

नशेसाठीची बंटा गोळी विकणाऱ्याला ठोकल्या बेड्या; शिवणेतून घेतले ताब्यात

Follow Us
Follow Us:

पुणे : नशेसाठी खाण्यात येणाऱ्या तसेच छुप्या पद्धतीने पण सहजरित्या बाजारात उपलब्ध होणारी भांगयुक्त ‘बंटा’ गोळी विकणार्‍या एकाला गुन्हे शाखेने पकडले आहे. त्याला शिवणे भागातून अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ४ किलो ८० ग्रॅम वजनाचे २४ मोठे पॅकेज जप्त केले आहे. गोळीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. अनेक विद्यार्थी व अल्पवयीन मुले या बंटा गोळीच्या आहारी गेल्याचे वास्तव आहे. काही दिवसांपुर्वी मुंढव्यात एका अल्पवयीनाने बंटा गोळी खाल्यानंतर नशेत चार ते पाच वाहनांची तोडफोड केली होती.

दिनेश मोहनलाल चौधरी (३०, रा. देशमुखवाडी, शिवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चौधरी हा मूळचा राजस्थानचा असून मागील पाच वर्षांपासून शिवणे भागात किराणा दूकान चालवितो. दरम्यान, नशेची सवय लागलेल्या तरूणांमध्ये भांगयुक्त असलेली ही गोळी ‘बंटा’ नावाने ओळखली जाते. बंटा कोडवर्ड वापरून शहरातील अनेक टपर्‍यांवर छुप्या पद्धतीने ही गोळी विकली जाते. सामान्य नागरिकांना ती सहजासहजी उपलब्ध होत नाही. मात्र, नशेखोर आणि कोडवर्डचा वापर करणार्‍यांना ती दिली जाते.

विशेष म्हणजे अगदी दहा ते पंधरा रूपयांना एक गोळी विकली जाते. परिणामी अनेकजण बंटा गोळीच्या आहारी गेले आहेत. गोळीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होत नसल्याने पोलिस यंत्रणेपुढेही आव्हान निर्माण झाले आहे. पाणी अथवा सोडा यामध्ये मिसळून ही गोळी खालली जाते. नंतर काही तास त्याचा परिणाम दिसून येतो. झोप लागते. व्हाईटनर, दारू यापेक्षा भांगयुक्त बंटा गोळी खाल्ल्यानंतर अधिक डेअरिंग येते, असा समज युवकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे भांगेची बंटा गोळी सध्या शहरात तेजीत असल्याचे वास्तव आहे.

देशमुखवाडी, शिवणे भागात एकाकडे बंटा गोळ्या असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानूसार सहायक निरीक्षक अनिकेत पोटे व त्यांच्या पथकाने चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या सुमारे १० हजार ८०० रुपयांचे बंटा गोळ्यांचे पॅकेट जप्त करण्यात आले आहेत.

आयुर्वेदीकच्या नावाखाली विक्री

शिवणेत अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी बंटा गोळ्या असलेली पाकिटे जप्त केली. त्यावर विजयावटी आयुर्वेदीक औषधी असे लिहीलेले आढळले. त्यामुळे आयुर्वेदीकच्या नावाखाली विक्रेत्यांकडून अशा भांगयुक्त गोळ्यांची विक्री होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांकडून अशा विक्रेत्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: Pune police arrests man selling intoxicating pills nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
1

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
2

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
3

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
4

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.