पुण्यात काही दिवसांपूर्वी शहरातील वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ समोर आला होता. वाहतूक विभागाच्या कर्मचार्यांने कॅब चालकाला मारहाण केली होती. याचा व्हिडीओ समोर आला होता. आता पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने थेट मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर संबंधित पोलीस उपनिरीक्षकासोबत असलेल्या मित्राने मेडिकल चालकाच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Mumbai Crime : मुंबईत ८१ वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात; ८.७० कोटी गमावले, नेमकं काय घडलं?
हि संपूर्ण घटना पुणे शहरातील नारायण पेठेत १३ ऑगस्ट रोजी घडली. तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. विजय सरवार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते चंदननगर पोलीस स्टेशन येथे परिविक्षाधीन (प्रोबेशनल) पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत.विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबाबत मेडिकल चालक महादेव चोरे यांनी फिर्याद दिली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नारायण पेठेत महादेव चौरे यांची मातोश्री मेडिकल आहे. ते मेडिकलमध्ये झाडू मारत होते. यावेळी त्यांच्या दुकानासमोर पोलीस उपनिरीक्षक विजय सरवार जर त्यांच्या मित्रांसोबत थांबले होते. दुकानासमोर उभे राहिलेल्या या लोकांना मेडिकल चालकाने बाजूला होण्यास त्यांनी सांगितले. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक विजय सरवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या हनुमंत रायकर यांनी फिर्यादु यांना मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली. त्याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला, याच प्रकरणात सुमित रायकर यांनी देखील महादेव चौरे यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिल्यावरून मेडिकल चालक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…
पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात एक विचीत्र अपघात घडला आहे. मैत्रिणीला घेऊन दुचाकीने निघालेल्या तरुणाला पाठिमागून आलेल्या दुसऱ्या दुचाकी चालकाने धडक दिली. यामध्ये तो तरुण आणि त्याची मैत्रिण खाली कोसळले. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तो तरुण सापडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शिवम सिंग (वय २२, रा. एअरफोर्स स्टेशन, विमाननगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारासह टेम्पोचालक इंद्रजीत संजय नरोटे (रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवम सिंग याची बहीण नेहा (वय २०) हिने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.