उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबणीवर
Thackeray-Shinde Conflicts: शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटात मागील तीन वर्षांपासून शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणासाठी मोठी लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात पक्षचिन्हाचा खटला प्रलंबित आहे. हे चिन्ह कुणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे, असे असतानाच पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षचिन्हाच्या सुनावणीचा दिवस ठरला आहे. येत्या ८ ऑक्टोबरला पक्षचिन्हाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जवळपास तीन वर्षांपासून ठप्प असलेला शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण चिन्हाचा वाद आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. पक्षाच्या मालकीसंदर्भातील या वादावर अंतिम निकाल लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाला तातडीने सुनावणीची विनंती केली होती, तर उद्धव ठाकरेंनीही भरसभेत लोकशाही जपण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे विनंती केली होती.
राष्ट्रपती सल्ला प्रकरणामुळे या सुनावणीची तारीख पुढील महिन्यात ८ ऑक्टोबर ठरवण्यात आली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर पक्षाचा आणि चिन्हाचा अंतिम निर्णय होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, यावर राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवली जाईल. त्यामुळे पक्ष, चिन्ह आणि आगामी निवडणुकीसंदर्भातील राजकीय वातावरण सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात विनंती केली होती. त्यावर येत्या २० ऑगस्टला सुनावणी घेण्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यामुळे ठाकरेंच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात मात्र अस्वस्थता दिसून आली. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि शंभुराज देसाऊ यांच्यासह एकनाथ शिंदे यांनीदेखील दिल्ली दौरा केला.
Irfan Pathan Interview : रोहित शर्मावरील टीकेवर इरफान पठाणचे मोठे विधान, म्हणाला – जर तो कर्णधार
राज्यातील आगामी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यासाठी दोन्ही पक्षांनी इच्छा व्यक्त केली. पण सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या आधी या प्रकरणाचा निकाल येणार की नंतर याबाबतही संदिग्धता कायम आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंसाठी धक्काच मानला जात आहे.
कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्या मते, मूळ शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण कोणाच्या हाती येईल, यावर अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाने 23 ऑगस्टनंतर घेणार आहे. याआधी तातडीने सुनावणी होण्याची मागणी केली गेली होती, परंतु न्यायालयाने, पक्षचिन्हाच्या याचिकेचा सखोल विचार करणे आवश्यक आहे, त्यामुळे तातडीची सुनावणी शक्य नाही. 19 ऑगस्टपासून कोर्टात दुसऱ्या महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी सुरू असल्याने पक्षचिन्ह प्रकरणासाठी थोडा वेळ लागणार आहे.