Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास

गणेश विसर्जनाच्या धामधुमीत पुण्यात चोरट्यांनी बंद फ्लॅटला लक्ष्य केले. शनिवार पेठेतील हसबनीस बखळ परिसरात घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 28, 2026 | 01:01 PM
Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास

Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास

Follow Us
Follow Us:
  • शनिवार पेठेत बंद फ्लॅट फोडला
  • ३० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
  • सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध

पुणे : शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त सुरू असतानाच मध्यवर्ती शनिवार पेठेतील हसबनीस बखळ परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून तब्बल ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. कुटुंबीय गणेश विसर्जनाच्या दिवशी नातेवाईकांकडे गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिक शुक्रवारी (२५ सप्टेंबर) गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी कुटुंबीयांसह नातेवाईकांकडे गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर कपाटाची झडती घेतली. कपाटातील सोन्याचे सुमारे ३० लाख रुपयांचे दागिने चोरून चोरटे पसार झाले.

हेही वाचा: LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

घरी परतताच धक्का

शनिवारी पहाटे कुटुंबीय घरी परतले. त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. कपाटातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी करून चोरीचा पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

विसर्जनाच्या गर्दीत चोरट्यांचा डाव

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मध्यवर्ती पुण्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त होता. अनेक भागांत वाहतूक व्यवस्था आणि मिरवणुकीच्या नियोजनासाठी पोलिसांची मोठी यंत्रणा तैनात होती. याच काळात बंद फ्लॅट हेरून चोरट्यांनी घरफोडी केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. चोरी करणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, संशयितांच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. चोरीतील सोन्याचे दागिने आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Web Title: Pune shaniwar peth house break in 30 lakh gold theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • House Theft
  • pune crime case
  • Theft Case

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी
1

Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत
2

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न
3

Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..
4

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.