
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
निधी ही आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती. मात्र उन्हाळी सुट्ट्यांमुळे ती आई-वडील आणि भावासह माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे गावी आली होती. निधी ही विलेपार्ले येथील सेंट जेव्हियर्स शाळेत शिक्षण घेत होती आणि नुकतीच नववीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. सोमवारी (२५ मे) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास निधी वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली. मात्र ती परत आलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध रात्रभर घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. बुधवारी (२७ मे) घरोशीवाडी परिसरातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी निधीच्या कुटुंबियांना घटनास्थळी बोलावले असता मृतदेह निधीचाच असल्याचे स्पष्ट झाले.
हत्येचा संशय, पोलीस तपास सुरु
जंगलात सापडलेल्या मृतदेहावर जखमांचे निशाण होते, निर्जन जंगलभागात सापडलेल्या मृतदेहा वरील जखमा पाहता हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. २४ तासात रायगड जिल्ह्यातील हत्येची ही दुसरी घटना असल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात रायगड जिल्ह्यात घडलेल्या सलग खूनाच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
रायगड हादरला! खालापूरमध्ये वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या
रायगड जिल्ह्यातून एक दुहेरी हत्या कांडाची घटना समोर आली आहे. एका वृद्ध जोडप्याचा गळा चिरून निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घडलेली घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका येथील निकडोली गावात मंगळवारी घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
Ans: निधी आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती.
Ans: सोमवारी रात्री मोबाईलवर बोलत ती घराबाहेर पडली होती, त्यानंतर ती बेपत्ता झाली.
Ans: जंगलात सापडलेल्या मृतदेहावर जखमांचे निशाण आढळल्यामुळे पोलिसांनी खुनाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.