Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: नेरळमध्ये गोळीबार! 15 गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपीने सलग दोन गोळ्या झाडल्या; सचिन भवर थोडक्यात बचावले

नेरळ, रायगड येथे 15 गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपी अविनाश मारकेने सचिन भवरवर मोटारसायकलवरून सलग दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी हुकली, दुसरी कंबरेजवळून गेली आणि भवर थोडक्यात बचावले. पोलिस तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 26, 2025 | 09:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सचिन भवरवर गोळीबार केला.
  • आरोपी अविनाश मारके 15 गुन्ह्यांमध्ये वाँटेड, पूर्वीचा वाद.
  • पोलिसांनी तपास सुरू करून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवली.
रायगड: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ येथे गोळीबाराची धक्कादायक घटना उघड झाली आहे. धुळे शहरातील १५ गंभीर गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेला आरोपी अविनाश जगनाथ मारके याने मोटारसायकलवरून येत सचिन भवर या व्यक्तीवर गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Dombivali Crime: डोंबिवली सुटकेस मर्डरचा उलगडा, १२ तासात पोलिसांनी केले उघड; कोणी केली हत्या? कारण काय?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अशोक भवर हे सोमवारी दुपारी रस्त्याने जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर थेट गोळीबार केला. आरोपींनी सलग दोन गोळ्या झाडत भवर यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. पहिली गोळी भवर यांच्या अंगाला न लागता हुकली, मात्र दुसरी गोळी उजव्या कंबरेजवळून घासून गेली. त्यामुळे सचिन भवर हे थोडक्यात वाचले. जखमी अवस्थेत ते स्वतः नेरळ पोलीस ठाण्यात गेले आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.

त्वरीत उपचार आणि पोलिसांची कारवाई

भवर यांची परिस्थिती लक्षात घेता नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या टीमने त्यांना तात्काळ नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पुढील तपासासाठी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही तपासणी सुरू केली. याच तपासात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले.

१५ गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपीचा शोध सुरू

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना समजले की गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एकाचा सचिन भवर यांच्याशी पूर्वीपासून वाद होता. आरोपी अविनाश जगनाथ मारके (वय ४५) हा काही वर्षांपूर्वी स्वामी समर्थ चाळीत भवर यांच्या जवळच राहत होता. त्यांच्यातील वैयक्तिक वादातूनच या गोळीबाराची घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अविनाश मारके हा धुळे शहरातील अंदाजे १५ गुन्ह्यांमध्ये वाँटेड असून सराईत गुन्हेगार आहे. सध्या तो फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबारात कोण जखमी झाला?

    Ans: सचिन भवर

  • Que: आरोपी किती गुन्ह्यांमध्ये वाँटेड आहे?

    Ans: आरोपी अविनाश मारके हा १५ गुन्ह्यांमध्ये वाँटेड

  • Que: घटना कोणत्या ठिकाणी घडली?

    Ans: रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे घटना घडली

Web Title: Raigad crime firing in neral the accused wanted in 15 crimes fired two consecutive shots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 09:48 AM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Kerala Crime : आई की क्रूरता…! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके
1

Kerala Crime : आई की क्रूरता…! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
2

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद
3

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न;  जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज
4

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.