संग्रहित फोटो
रमेश मसनाजी पिट्टलवाड (वय २५, रा. धगनगर वस्ती उरूळी देवाजी, मुळ. नादेंड) तसेच त्याची सावत्र आई मुक्ताबाई मसनाजी पिट्टलवाड (वय ३५, साखरे वस्ती हिंजवडी) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नानासाहेब जाधव आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
रमेश मुळचा नादेंड जिल्ह्यातील असून, तो कामानिमित्त पुण्यात आलेला आहे. तो फुरसुंगी भागात राहत होता. त्याची एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली होती. त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या वयाचा फायदा घेत तिच्या मनात विश्वास निर्माण केला. नंतर मात्र, तिला पळवून नेले. त्यामध्ये त्याची सावत्र आई मुक्ताबाई हिने मदत केली. तिने रमेशला मुलीला घेऊन जाताना माझे नातेवाईक हैद्राबादला आहेत, तु तिकडे जा असे सांगून खर्चासाठी पैसे दिले होते. रेल्वेने दोघे हैद्राबादला गेले होते.
दरम्यान, मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी फुरसूंगी पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनेचे गांर्भिय ओळखत तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यावेळी रमेश हा हैद्राबादला असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या सावत्र आईला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने दोघे हैद्राबादला गेल्याचे सांगितले. परंतू पोलिस पोहचण्यापुर्वीच तो मुलीला घेऊन तेथून पसार झाला होता. तांत्रिक विश्लेषन व बातमीदारांच्या माहितीनुसार रमेश आणि अपह्रत मुलगी उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बामणौली गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथक उत्तरप्रदेशात दाखल झाले.
चार दिवस स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहिम राबवत रमेशचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. तो उत्तरप्रदेशात राहणाऱ्या त्याच्या मावशी-काकाकडे थांबला होता. पोलिसांनी रमेशला पकडून पुण्यात आणले. १८ ऑक्टोबर रोजी रमेश मुलीला घेऊन पळाला होता. तब्बल एक महिना तपास करून फुरसूंगी पोलिसांनी अखेर त्याला पकडून मुलीची सुटका केली.






