Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चलो निकलो यहा से! रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; बांग्लादेशी महिलेला केली अटक

बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे चक्क कॅनरा बँकेत खाते उघडून भारतीय प्रशासकीय आणि बँकिंग व्यवस्थेची मोठी फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 09, 2026 | 02:43 PM
चलो निकलो यहा से! रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; बांग्लादेशी महिलेला केली अटक
Follow Us
Follow Us:

संगमेश्वरमध्ये पकडली बांगलादेशी महिला
बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
परदेशी महिलेला आश्रय देऊन पतीने केली धूळफेक

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यात सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केलेल्या एका महिलेला संगमेश्वरमधील आंबेड खुर्द येथे चक्क आश्रय देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी (Ratnagiri) ६ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा मोठी धडक कारवाई करत, संबंधित बांगलादेशी महिलेसह तिला मदत करणाऱ्या तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द मुस्लिम मीहल्ला येथील युसूफ महंमद सय्यद याने सिनेम युसूफ सय्यद उर्फ शांतना अहमद खान (मूळ रा. खिलगाव, जिल्हा गाजीपुर, ढाका, बांगलादेश) ही परदेशी नागरिक आहे, हे पूर्णपणे माहित असतानाही तिच्याशी लग्न केले, आरोपी युसूफने तिला भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करण्यासाठी केवळ आश्रयच दिला नाही, तर ती भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी तिची बनावट सरकारी कागदपत्रे तयार करून घेतली. या बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे चक्क कॅनरा बँकेत खाते उघडून भारतीय प्रशासकीय आणि बँकिंग व्यवस्थेची मोठी फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक

एका घुसखोर महिलेने भारतीय व्यवस्थेचा अशा प्रकारे गैरफायदा घेतल्याने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ मार्च २०२६ रोजी दुपारी २.२५ वाजता संगमेश्वर पोलिसांनी आबेड खुर्द येथील संशयित पत्त्यावर अचानक छापा टाकला. यावेळी ही महिला कोणत्याही वैध अधिकाराशिवाय भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल कोमल उत्तम ढोले यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार पती पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Osaman Hadi Muder : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीचे मारेकरी जेरबंद; भारतात लपून बसले होते आरोपी?

तपासादरम्यान संबंधित महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे ठोस पुरावे समोर आल्याने पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेतले. घुसखोरीच्या घटनेने संगमेश्वरच्या शांततेला सुरुंग लावला आहे. भारतीय पतीने केवळ आश्रयच नव्हे, तर भारतीय प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून या पस्देशी महिलेचे बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड देखील तयार करण्यात आले. या कारवाईने संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Ratnagiri police arrested bangladesh women live in sangmeshwar crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Bangladesh People
  • crime news
  • Ratnagiri police

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.