Osaman Hadi Muder : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीचे मारेकरी जेरबंद; भारतात लपून बसले होते आरोपी? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड
पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्य दलाने (STF) ०७ आणि ०८ मार्च २०२६ रोजी केलेल्या धडक कारवाईत उस्मान हादीच्या हत्यारांना पकडण्यात आले आहे. एकाची ओळख ३७ वर्षीय राहुल उर्फ फैसल करीम मसूद , दुसऱ्याची आलमगीर हुसैन वय वर्षे ३४ अशी ओळख पटवण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींवर हत्या, खंडगी आणि इतर काही गंभीर गुन्हेही दाखल आहेत.
पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्य दलाने (STF) केलेल्या तपासादरम्यान या दोन्ही आरोपींनी बांगलादेशात हादीची हत्या केल्यानंतर मेघालय सीमेवरुन भारतात घुसखोरी केली होती. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी ते लपून बसले होते. संधी मिळताच ते बांगलादेशात पुन्हा पळून जाण्याच्या तयारीत होते. यासाठी त्यांनी पश्मिम बांगलाच्या बोनगाव येथून फरार होण्याचा प्लॅन रचला होता. यावेळीच दोन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच बंगाल पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Ans: उस्मान हादी बांगलादेशधील प्रसिद्ध विद्यार्थी नेता आणि इंकलाब मंच संघटनेचा प्रमुख प्रवक्त होता.
Ans: १२ डिसेंबर २०२५ रोजी पल्टन परिसरात ऑटो रिक्षातून हादी प्रवास करत होता. यावेळी त्याच्यावर दोन आरोपींनी मोटारसायकलवर येऊन त्याच्या डोक्यात गोळी झाडली.
Ans: बांगलादेशातील प्रसिद्ध विद्यार्थी नेते उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Ans: पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्य दलाने (STF) ०७ आणि ०८ मार्च २०२६ रोजी उत्तर २४ परगणा जिल्ह्यात सीमावर्ती शहर बोनगावमध्ये उस्मान हादीच्या मारेकऱ्यांना अटक केली.






