Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगर हादरलं! ३ महिन्यांत ४६८ नागरिक बेपत्ता; बेपत्ता होण्यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक, पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

Sambhajinagar Missing Persons: छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान ४६८ नागरिक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये २६६ महिला असून १३२ जणींचा अद्याप शोध लागलेला नाही. वाढत्या अपहरणामुळे शहर हादरले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 07, 2026 | 03:53 PM
संभाजीनगर हादरलं! ३ महिन्यांत ४६८ नागरिक बेपत्ता (Photo Credit- AI)

संभाजीनगर हादरलं! ३ महिन्यांत ४६८ नागरिक बेपत्ता (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • संभाजीनगर हादरलं! ३ महिन्यांत ४६८ नागरिक बेपत्ता
  • बेपत्ता होण्यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक,
  • पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान
अंकुश थोरात/नवराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, शहरातील बेपत्ता प्रकरणांनी धोक्याची पातळी गाठली असून, महिलांच्या वाढत्या बेपत्ता होण्याच्या घटनांनी परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ४६८ नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यामध्ये २६६ महिलांचा समावेश असून, ही संख्या एकूण प्रकरणांच्या निम्म्याहून अधिक आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येत आहे.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण ४६८ प्रकरणांपैकी २४७ जणांचा शोध लागला आहे, तर २२१ जण अद्याप बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे, न सापडलेल्या व्यक्तींमध्येही महिलांचे प्रमाणच अधिक असून १३२ महिला अजूनही सापडलेल्या नाहीत. त्यामुळे बेपत्ता प्रकरणांमध्ये महिलांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. एकूण आकडेवारी पाहता, १९६ पुरुष, २६६ महिला आणि ६ इतर असे चित्र समोर आले आहे. महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक असल्याने ही बाब गंभीर सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेची समस्या म्हणून पुढे येत आहे.

महिन्यानुसार वाढताहेत बेपत्ता होणाऱ्याची संख्या

जानेवारी ते मार्च या कालावधीत बेपत्ता प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसते. जानेवारी महिन्यात १५० नागरिक बेपत्ता झाले होते. फेब्रुवारीत ही संख्या किंचित घटून १३४ झाली; मात्र मार्च महिन्यात अचानक वाढ होऊन १८४ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मार्चमधील हा उच्चांक प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.

नसरापूर, पर्वतीनंतर आता अकोल्यातील अत्याचार प्रकरण समोर; 60 वर्षीय नराधमाचा बालिकेवर अत्याचार

धोकादायक संकेत

एकूण २६६ महिलांपैकी १३४ महिलांचा शोध लागला असला तरी अजूनही १३२ महिला बेपत्ता आहेत. सापडलेल्या आणि न सापडलेल्या महिलांची संख्या जवळपास समान असल्याचे चित्र दिसत आहे. हे प्रमाण अत्यंत चिंताजनक असून महिलांच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांची परिणामकारकता प्रश्नांकित होत आहे. त्यामुळे महिला बेपत्ता होण्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
बेपत्ता होणाऱ्यात अल्पवयीन मुलींचाही मोठा वाटा या तीन महिन्यांत ३० मुलगे आणि ४६ मुलीच्या अपहरणाच्या घटना नोंदल्या गेल्या. त्यापैकी २५ मुलगे आणि ३४ मुली सापडल्या असल्या, तरी काही मुली अजूनही बेपत्ता आहेत. एकत्रित आकडेवारीनुसार ७१ मुली अद्याप सापडलेल्या नाहीत. अल्पवयीन मुलीचे हे वाढते प्रमाण अधिकच गंभीर मानले जात असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रलंबित प्रकरणांचा वाढता आकडा

मार्चअखेरपर्यंत १२ मुले आणि ७१ मुली बेपत्ता असल्याची नोंद आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या या प्रकरणांमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा बनत आहे. पोलिस यंत्रणांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून, या प्रकरणांचा छडा लावणे मोठे आव्हान ठरत आहे.

बेपत्ता वाढीमागील संभाव्य कारणे

  • कौटुंबिक वाद व मानसिक ताण घरगुती कलह, दबाव आणि तणावामुळे अनेक महिला व मुली घर सोडण्याचा निर्णय घेतात.
  • सोशल मीडियाचा प्रभाव अनोळखी व्यक्तींशी संपर्क, ऑनलाईन फसवणूक व प्रेमसंबंधांचे आमिष यामुळे प्रकरणे वाढत आहेत.
  • रोजगार व शिक्षणासाठी स्थलांतर शहराबाहेर गेल्यानंतर संपर्क तुटल्याने काही जण बेपत्ता म्हणून नोंदवले जातात.
  • अपहरण व मानवी तस्करी काही प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त होते.
  • पालकांचे दुर्लक्ष व जागरूकतेचा अभाव संवादाचा अभाव आणि सुरक्षिततेबाबत अपुरी माहिती हीही कारणे ठरत आहेत.
पुण्यातील नगरसेविकेसह पतीविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Rising missing persons cases in chhatrapati sambhajinagar women safety report 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
1

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
2

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.