उल्हासनगर : उल्लासनगरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आरोपीने रिक्षा थांबवून फिर्यादीला किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवता फिर्यादी व त्याच्या साथीदाराकडून तब्बल २१ हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने लुटली आहे.
पुणे विमानतळावर 13 किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; चौघांना ठोकल्या बेड्या
नेमकं काय घडलं?
एक २७ वर्षीय अजयकुमार शामल गौतम हे २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ते आपल्या मित्रासोबत रिक्षाने श्रीराम चौक ते उल्हासनगर कॅम्प ५ येथे जात सरकारी प्रसुतीगृहाजवळील ‘रिअल टच’ दुकानाजवळ आरोपीने रिक्षा थांबवून फिर्यादीला किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ करून मारहाण केली.त्यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्याच्या साथीदाराकडून तब्बल २१ हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने लुटली. एवढेच नाही तर आरोपीने रिक्षाचालकाला देखील चाकू दाखवत स्टेशनकडे पलायन केले.
या गंभीर गुन्ह्याची नोंद विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. सर्टीफाय स्कूलसमोरील मैदान, उल्हासनगर-४ येथे सापळा लावून पोलिसांनी आरोपी संजय रतन राठोड यास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात लुटलेले २१ हजार रुपये व चाकू जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस १ सप्टेंबर रोजी पहाटे अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उल्हासनगरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईचे कौतुक व्यक्त होत आहे.
ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने इंजिनिअर तरुणाला बनवले चोर
गेमिंगचे व्यसन तरुणांना उद्ध्वस्त करत आहे. या व्यसनामुळे ते जाणीवपूर्वक किंवा नकळत गुन्हेगारीच्या दलदलीत अडकत आहेत. तहसील पोलिस ठाण्यांतर्गत असाच एक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामध्ये गेमिंगच्या व्यसनामुळे एक तरुण अभियंता आरोपी बनला.
ब्रेसलेट खरेदी करण्याच्या बहाण्याने इतवारी येथील कक्कड ज्वेलर्समध्ये घुसला. त्याने त्याच्या हातावर दोन ब्रेसलेट वापरून पाहिले. त्यानंतर, गाडीतून क्रेडिट कार्ड आणण्याच्या बहाण्याने दोन्ही ब्रेसलेट घेऊन फरार झाला. मात्र, गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने तक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपीला शोधून काढत बेड्या ठोकल्या. शुभम परसराम डुकरे (वय २९, रा. कीर्तीनगर, दिघोरी हुडकेश्वर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभमला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन आहे. या व्यसनामुळे त्याच्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी करण्याचे ठरवले.
‘आप’चा आमदार पोलिसांवर गोळीबार करून फरार, बलात्काराच्या आरोपाखाली अटक