छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नंदनवन कॉलोनी या उच्चभ्रू सोसायटीतील आपारमेंटच्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होते. या व्यवसायाचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका पीडित महिलेची सुटका करून आंटीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिनाज उस्मान बेग वय ४५ असे अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.
पुण्यात पुन्हा भीषण अपघात; दुचाकीवरील दोघे सिमेंट मिक्सच्या चाकाखाली आले अन्…
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील नंदनवन कॉलनीतील विठ्ठल विशाखा अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये एक महिला वेश्या व्यवसाय करत आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांना मिळाली. सहाय्यक आयुक्तांनी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
विवेक जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक नागवे यांच्यासह महिला दक्षता समितीच्या सदस्यांसह टीम तयार केली. एका पंटरला फ्लॅटमध्ये पाठवले. वेश्या व्यवसाय चालवणारे मिनाज बेग हिच्याशी सौदा करत दोन हजार रुपये ठरले. मिनाज हिने एक महिला पंटरसोबत बेडरुममध्ये पाठवली. ठरल्याप्रमाणे पंटरने बेडरूम मध्ये जाताच मिस कॉल मारला.
मिस कॉल येताच पथकाने फ्लॅटमध्ये छापा टाकला. यावेळी एका पीडित महिलेची सुटका केली. याप्रकरणी हमालदार जालिंदर मांटे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंटी मिनाज बेग हिला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेखा लोंढे करीत आहेत.
मूर्तीजापूरात ‘हनी ट्रॅप’चा पर्दाफाश! ‘तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा टाकू’ म्हणत सराफाकडून लाखो रुपये उकळले
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातून ‘हनी ट्रॅप’ चा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका ५२ वर्षीय सराफा व्यावसायिकाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची भीती दाखवत एकूण 18 लाख 74 हजार रुपयांची लूट केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी जोडप्याला पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
‘आप’चा आमदार पोलिसांवर गोळीबार करून फरार, बलात्काराच्या आरोपाखाली अटक