अकोला: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातून ‘हनी ट्रॅप’ चा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका ५२ वर्षीय सराफा व्यावसायिकाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची भीती दाखवत लाखो रुपयांची लूट केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी जोडप्याला पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
Beed Crime: बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी उचलले टोकाचे पाऊल, बीडच्या अंबाजोगाईतील घटना
नेमकं काय घडलं?
फिर्यादी हे अकोला शहरातील रहिवासी आहे. ते १६ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत पैसे जमा करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची ओळख मूर्तिजापूर तालुक्यातील खराब ढोरे गावातील लता नितेश थोप या महिलेशी झाली. या अनोळखीच्या माध्यमातून तिने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक मिळवला व त्यांच्याशी वारंवार संपर्क साधू लागली.
२ जुलैला लताने पती घरी नसल्याचे सांगत फिर्यादीला आपल्या घरी बोलावले. फिर्यादी दुपारी १२ वाजता तिच्या घरी पोहोचेल असता, अचानक तिचा पती नितेश प्रभाकर थोप तिथे येऊन पोहोचला आणि त्याने त्या दोघांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यानंतर, या दाम्पत्याने फिर्यादीस बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच, हे फोटो समाजात व नातेवाईकांमध्ये प्रसारित करण्याची भीती दाखवून सुरुवातीला ३ लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादीने भीतीपोटी त्यावेळी तीन लाख रुपये दिले.
मात्र ते पैसे देऊन सुद्धा ते शांत बसले नाही. त्यांनतर वेळोवेळी धमक्या देत या दाम्पत्याने आणखी रक्कम उकळली. एकूण 18 लाख 74 हजार रुपये वसूल केले. तरीही आरोपी थांबले नाही. पुन्हा एकदा 5 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी मात्र फिर्यादीने मूर्तीजापूर ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
रंगेहात अटक
फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपींना पैसे घेतांना रंगेहात पकडले. मुर्तीजापूर- अकोला रोडवरील टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी लता नितेश थोप व नितेश प्रभाकर थोप या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यात यापूर्वीही दोन व्यापाऱ्यांना अशाच प्रकारे फसविल्याच्या घटना घडल्या आहेत.
शासकीय कंत्राटदाराचे टोकाचे पाऊल; कारण काय?
नागपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शासकीय कंत्राटदराने गळ्याला दोर लावतात आपले जीवन संपवले. आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव पीव्ही वर्मा असे आहे. वेळेत थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. जवळपास तीस कोटी रुपयांची त्यांचे थकीत बिल बिल शासनाकडे प्रलंबित होते. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.