ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी
सणावाराच्या दिवसांमध्ये घरात अनेक वेगवेगळे गोड पदार्थ कायमच बनवले जातात. कधी शेवयांची खीर तर कधी गुलाबजाम, रसमलाई इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण पारंपरिक पदार्थ गणपती उत्सवाच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. ओल्या नारळाच्या आतील खोबऱ्याचा वापर भाजी, आमटी किंवा इतर मसालेदार पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ओल्या खोबऱ्याच्या वड्या आठवडाभर व्यवथित टिकून राहतात. याशिवाय रात्री जेवणानंतर कोणताही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही खोबऱ्याची वडी खाऊ शकता. कमीत कमी साहित्यामध्ये कोणताही गोड पदार्थ बनवण्याचा असेल तर तुम्ही खोबऱ्याच्या वड्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मऊ लुसलुशीत खोबऱ्याच्या वड्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी
वाटीभर पनीरपासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रसमलाई मोदक! नोट करून घ्या मोदक बनवण्याची सोपी रेसिपी