Satara Crime news: फलटण येथील तरुण डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली आहे. सातारा ग्रामीण पोलिसांनी आज (शनिवार) पहाटे सुमारे चार वाजता ही कारवाई केली. फलटण पोलिसांनी या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक आणि प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर दोघेही फरार होते, मात्र अखेर प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बनकर हा घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त केली होती. अखेर तो मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपलेला असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा उल्लेख केला होता. या प्रकरणाचा पुढील तपास सातारा ग्रामीण पोलिस करत आहेत.
देव तारी त्याला…! दुचाकीवरून महिला पडली; मागून कार येत असतानाच अचानक ब्रेक दाबला अन्…
आत्महत्येपूर्वी डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावं नमूद करण्यात आली होती. सुसाईड नोटनुसार, या दोघांनी डॉक्टर तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शुक्रवारी फलटण पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी दोघेही फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या दोन विशेष पथकांना रवाना करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी पहाटे सातारा ग्रामीण पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकरला अटक केली असून, पीएसआय गोपाल बदनेचा शोध अद्याप सुरू आहे. फलटणमध्ये तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी नवे तपशील समोर आले आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी प्रशांत बनकर हा डॉक्टर राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डॉक्टरला पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांकडून सातत्याने त्रास दिला जात होता. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून डॉक्टरने आयुष्य संपवले, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. गुरुवारी फलटणमधील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी प्रशांत बनकरला शनिवारी पहाटे अटक केली असून, पीएसआय गोपाल बदनेचा शोध अद्याप सुरू आहे.
फलटण येथे तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी तळ हातावर पेनाच्या सहाय्याने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे नमूद केली होती. महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात कठोर कारवाई आणि फाशीची मागणी केली आहे.
घटनेमुळे स्थानिक राजकारणही तापले असून, या प्रकरणात काही राजकीय नेत्यांवरही आरोप केले जात असल्याचे समजते. पोलिस अद्याप फरार असलेल्या पीएसआय गोपाल बदनेचा शोध घेण्यासह प्रकरणाचा तपास करत आहेत.






