Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: पर्यटनमार्गावर थरारक घटना! आंबेनळी घाटात अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला; फॉरेन्सिक तपास सुरू

आंबेनळी घाट परिसरात रस्त्यालगत मोरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त होत असून पोलिसांकडून सीसीटीव्ही व तांत्रिक तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 26, 2026 | 09:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रस्त्याच्या दुरुस्ती कर्मचाऱ्यांना दुर्गंधी आल्याने मृतदेह आढळला.
  • मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; हत्या असल्याचा प्राथमिक संशय.
  • पोलादपूर पोलिसांकडून फॉरेन्सिक तपास व सीसीटीव्ही पडताळणी सुरू.
सातारा: पर्यटन मार्गावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. मृतदेह मोरीत कोंबून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला.मृतदेह आंबेनळी घाट परिसरात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली व चिरेखिंडीच्या वरती असलेल्या मुख्य रस्त्यालगत आढळून आला. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय घडलं नेमकं?

आंबेनळी घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. बुधवारी सकाळी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी रस्त्यालगत असलेल्या मोरीत डोकावून पहिले असता त्यांना एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. पोलिसांनी तात्काळ पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Nanded Crime: लग्नासाठी दबाव आणि बदनामीची भीती; नांदेडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. तपासणीसाठी फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थकी दाखल झाली. हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोरीत टाकण्यात आल्याची शक्यता प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे ३० ते ४० वर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसात बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींचा आढावा घेतला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस सर्वच दृष्टिकोनातून तपास करत आहे. नागरिकांनी परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी तसेच या घटनेचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण; शुद्धीवर आली तेव्हा पुणेत

सातारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी एक्सट्रा क्लाससाठी जात होती तेव्हा हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराकडून तिने लिफ्ट घेतली. त्यांनतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यांनतर ती पुण्यात असल्याचे लक्षात आले. तिने स्थानिकाच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांनतर ती सुखरूप घरी परतली.

Uttarpradesh Crime: पुन्हा निळा ड्रम प्रकरण! थरारक वेबसिरीज बघितली अन् जन्मदात्याची केली हत्या, 21 वर्षीय मुलाला अटक

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: आंबेनळी घाटातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या मोरीत मृतदेह आढळला.

  • Que: मृत महिलेची ओळख पटली आहे का?

    Ans: नाही, अद्याप ओळख पटलेली नाही; वय अंदाजे 30–40 वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • Que: पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे?

    Ans: हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा संशय लक्षात घेऊन सीसीटीव्ही, मोबाइल लोकेशन आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.

Web Title: Satara crime thrilling incident on the tourist route partially burnt body of a woman found in ambenali ghat forensic investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले
1

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले

Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन
2

Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
4

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.