काय घडलं नेमकं?
किनवट तालुक्यातील अंधबोरी येथील दोन बहिणी शिक्षणासाठी नांदेड शहरातील पंढरपूर नगर येथे भाड्याने राहत होत्या. मृतक अल्पवयीन मुलगी ही दहावीत शिक्षण घेत होती. किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील दीपक सोळंके सोबत ओळख झाली. तेव्हा दोघांनी मोबाईलमध्ये एकत्र फोटो काढले होते. ते दोघे फोन वर बोलत होते. मात्र काही करणास्तव पीडित मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यानंतर दीपक हा लग्नास आणि बोलण्यास भाग लावत असे, आणि जर होकार नाही दिला तर एकत्र असलेली फोटो व्हायरल करतो अशी धमकी तो देत होता. दरम्यान,आरोपी दिपकचा चुलत भाऊ पवन साळुंके हा देखील मृत मुलीच्या बहिणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. असा आरोप मृतक मुलीच्या वडिलांनी तक्रारीत केले आहे.
Chandrapur: चंद्रपूरमध्ये 13 महिन्यांत 82 मृत्यू; महामार्ग की ‘मृत्यूचा सापळा’?
आपली बदनामी होणार या भीतीने अल्पवयीन मुलीने २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास खोलीतील स्लॅबच्या हुकास ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मृतक मुलीच्या घरमालकाने तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी दीपक विष्णू सोळंखे, पवन शंकर साळुंके, करण शंकर साळुंके, विष्णू उत्तम साळुंके, शंकर उत्तम साळुंके या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ
नांदेड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाची खंजीराने वार करून हत्या करण्यात आली आहे. कमलप्रीत सिंग खालसा असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो केवळ १६ वर्षांचा होता. ही घटना गोवर्धन घाट पुलाजवळ घडली. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Ans: नांदेड शहरातील पंढरपूर नगर परिसरात ही घटना घडली.
Ans: मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी व लग्नासाठी दबाव हे कारण असल्याचा आरोप आहे.
Ans: तरुणासह पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






