Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयत्याने तरुणावर हल्ला करणाऱ्या तिघांना बेड्या; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

जुन्या भांडणाच्या कारणातून बारामती येथून साताऱ्यात परीक्षेसाठी आलेल्या युवकाला बेदम मारहाण करून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या तिघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 31, 2025 | 01:12 PM
कोयत्याने तरुणावर हल्ला करणाऱ्या तिघांना बेड्या; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
Follow Us
Follow Us:

सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून बारामती येथून साताऱ्यात परीक्षेसाठी आलेल्या युवकाला बेदम मारहाण करून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या तिघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कोयता, दुचाकी व मोबाईल असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वैष्णव सुभाष ननावरे (वय १९, राहणार पवारवाडी, वर्धनगड, तालुका खटाव), जय राहुल ठोंबरे (वय १९, राहणार आजादपूर, तालुका कोरेगाव), शंकर जाधव (वय १९, राहणार आदर्शनगर, तालुका कोरेगाव) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून या तिघांनी जिल्हा रुग्णालय मार्गावर गाडी आडवी मारून फिर्यादीला कोयता मारून जखमी केले होते. दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली होती. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल कोयता आणि मोबाईल असे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, इरफान मुलांनी तुषार भोसले यांनी कारवाईत भाग घेतला. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी सातारा शहर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

फिर्यादीला धारदार कोयत्याने मारहाण

सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता ननावरे व त्याच्या दोन मित्रांचे फिर्यादी बरोबर बारामती येथे काही कारणावरून भांडण झाले होते. त्या रागातून फिर्यादीची बारामती येथून माहिती काढून तो साताऱ्यात परीक्षेला येणार होता. आरोपींनी नियोजन करून त्याला मारण्याचा कट रचला होता. सिव्हिल हॉस्पिटल रोडवर फिर्यादीला धारदार कोयत्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. तेथून संशयित पळून गेले.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; घरफोड्या अन् वाहन चोऱ्या करणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

तीन दिवसाची पोलीस कोठडी

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने खटाव, कोरेगाव आणि बारामती येथे गोपनीय तपास करून संशयितांची नावे निष्पन्न करून या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली. खटाव व कोरेगाव येथून संबंधित तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Satara police have arrested three people who attacked the youth nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Satara Crime
  • Satara Police

संबंधित बातम्या

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त
1

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना
2

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा
3

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा
4

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.