Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Violence: शाळेत धक्कादायक प्रकार! 8 वर्षांच्या चिमुकल्याला गळ्याला पकडून उचलले अन्…; मुख्याध्यापकाची क्रूर वर्तणूक

School Violence: अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यम शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या 8 वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापकाने गळ्याला पकडून उचलत त्याच्या हाताचा चावा घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2026 | 12:01 PM
शाळेत धक्कादायक प्रकार! 8 वर्षांच्या चिमुकल्याला गळ्याला पकडून उचलले अन्...; मुख्याध्यापकाची क्रूर वर्तणूक, पालक संतप्त

शाळेत धक्कादायक प्रकार! 8 वर्षांच्या चिमुकल्याला गळ्याला पकडून उचलले अन्...; मुख्याध्यापकाची क्रूर वर्तणूक, पालक संतप्त

Follow Us
Follow Us:
  • शाळेत धक्कादायक प्रकार!
  • 8 वर्षांच्या चिमुकल्याला गळ्याला पकडून उचलले
  • मुख्याध्यापकाची क्रूर वर्तणूक
 

School Violence: अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत मुलांनी दंगा केल्यास शिक्षकांकडून समज देणे किंवा सौम्य शिक्षा देणे ही सामान्य बाब मानली जाते. मात्र, एका शाळेच्या मुख्याध्यापकाने इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याशी अमानुष वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील काही विद्यार्थ्यांमध्ये आपापसात भांडण सुरू होते. त्यावेळी संबंधित आठ वर्षीय विद्यार्थ्याने ही बाब आपल्या वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वर्गशिक्षिकांनी शाळेचे मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले. मुख्याध्यापक वर्गात आल्यानंतर त्यांनी भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळले, त्यानंतर “भांडण कसे करतात ते मी दाखवतो,” असे म्हणत त्यांनी तक्रार करणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा पकडून त्याला वर उचलले. त्यानंतर खाली उतरवून त्याच्या हाताला चावा घेतला.

Tasgaon News: तासगावच्या पालिका शाळा अंधारात; विरोधकांचे ‘भीक मागो’ आंदोलन, सत्ताधाऱ्यांवर शिक्षणाशी खेळल्याचा घणाघात

घरी गेल्यावर मुलाने सांगितला प्रकार

शाळेतून घरी परतल्यानंतर विद्यार्थ्याने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलाच्या हातावरील जखम पाहून पालकांना धक्का बसला. त्यांनी तातडीने शाळेच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून याबाबत जाब विचारला. पालकांच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापकांनी “माझ्याकडून चुकून ही घटना घडली. मी लेखी स्वरूपात माफी मागतो. कृपया तुमचा पत्ता द्या,” असे सांगितले. मात्र, आपल्या मुलाशी झालेल्या कथित गैरवर्तनामुळे संतप्त झालेल्या पालकांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.

मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी संबंधित पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांच्याविरुद्ध नगर तालुका (ग्रामीण) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, घटनेमागील सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांत विविध शाळांमध्ये माकडांनी घुसून विद्यार्थी व शिक्षकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये एकलव्य विद्यालयातील एका शिक्षकासह कमला नेहरू विद्यालयातील तीन विद्यार्थी आणि डी.आर. हायस्कूलमधील एका विद्यार्थ्याला दुखापत झाली आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये चिंता वाढली असून शाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने नागरिकांना आणि शाळा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

शाळेच्या व्हॅनवर काळाचा घाला! रेल्वे फाटकावर बसला ट्रेनची धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी जखमी

Web Title: School violence principal bites class 3 student ahilyanagar private school shocking incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • education news
  • Private School

संबंधित बातम्या

पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांना पीएच.डी. पदवी प्रदान
1

पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Education News: राज्यात वैद्यकीय MBBS-BDMS च्या दुसऱ्या यादीत10,938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
2

Education News: राज्यात वैद्यकीय MBBS-BDMS च्या दुसऱ्या यादीत10,938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
3

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

Bail Pola 2026: ‘पावसाची आस, बळीराजाचा श्वास’; बैलांच्या अंगावर दुष्काळाची व्यथा, अहिल्यानगरमध्ये पोळ्यावर संकटाचे सावट
4

Bail Pola 2026: ‘पावसाची आस, बळीराजाचा श्वास’; बैलांच्या अंगावर दुष्काळाची व्यथा, अहिल्यानगरमध्ये पोळ्यावर संकटाचे सावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.